आलेगाव दि 19 प्रतिनिधी पातूर तालुक्याला दि 17 व 18 रोजी अवकाळी वादळ वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या शेतपिकाना झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.त्याची दखल घेत बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी दि 19 रोजी आलेगाव, जाब, पिंपळडोळी, नवेगाव, मळसूर,आदी शेतशिवारासह अनेक गावातील नुकसान शेतीला भेट देऊन नुकसान शेतीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत शेतकऱ्यांच्या नुकसान पिकाचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडून व चर्चा करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देऊन उपस्थित पातूर तहसीलचे तहसीलदार दीपक बाजड कृषी अधिकारी धनंजय शेटे यांना नुकसान शेतीचे सर्व्हेक्शन त्वरित करण्याचे सांगितले. गहू, हरभरा,कांदा तसेच फळबागेचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी विविध बँके कडून घेतलेले पीककर्ज कसे फेडावे ही चिंता आमदार महोदया समोर शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच गत खरीप पिकाची नुकसान मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा झाली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली असता सदरचा अहवाल शासनाकडे पाठविला असून निधी उपलब्ध होताच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल असे तहसीलदार दीपक बाजड यांनी सांगितले. या वेळी मंडळ अधिकारी आर. पी. गंगाखेडकर, तलाठी सबनीस,शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र मुर्तडकर, किशोर राऊत, माजी सरपंच प्रशांत देशमुख, बि. टी. देशमुख, हिरासिंग राठोड, शेकडो शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news