ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाशिंबा नजीकची घटना

बोरगाव मंजू

राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नजीकच्या नवीन बायपास वर मालवाहू ट्रक च्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना १९ फेब्रुवारी रविवार रोजी रात्री आठ वाजता दरम्यान घडली,

 

महादेव मुंडे असे मृतकाचे नाव आहे

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू कडून अकोला कडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक जी जे ०३ बी व्ही 8824 जात होता तर आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच 30 के ए 4588 वरुन दुचाकीस्वार अकोला कडून मुर्तिजापूर कडे जात असताना नवीन बायपास वर मालवाहू ट्रक च्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे, हेडकॉन्स्टेबल संतोष निबेंकर शरद बुंदे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला असता महादेव सुपळा मुंडे वय 42 रा आसलगाव ता जळगाव जामोद असे मृतकाचे नाव निष्पन्न झाले , तर सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला, दरम्यान अपघातानंतर सदर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला,तर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चालकाचा शोध घेत आहेत

By admin

2 thoughts on “ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार  ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news