View this post on Instagram
बिहार विधानसभा निवडणुकीत NDA आघाडी शानदार विजय मिळवताना दिसत आहे. भाजप आणि जेडीयू हे दोन प्रमुख पक्ष असलेल्या या आघाडीने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न समोर येत आहे. NDA ने नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली होती. मात्र कोणत्याही नेत्याचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले नव्हते. आता बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
फडणवीसांनी मानले जनतेचे आभार
बिहार विधानसभेतील एनडीएला मिळालेल्या यशाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मी बिहारच्या जनतेचे आणि सर्व मतदारांचे आभार मानतो. बिहारने पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. चिराग पासवास, मांझी अशी आमची युती होती, त्याला चांगला प्रतिसाद जनतेले दिला. यातून जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या जनतेचा असलेला विश्वास दिसून आला आहे.’
