प्रतिनिधी शाम वाळस्कर सत्य लढा न्यूज मुर्तीजापुर – अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये एकाच प्रभागातून वंचित बहुजन आघाडी च्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिला गेल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. मूर्तिजापूर नगर परिषदेच्या नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकाच प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या दोन उमेदवारांना एबी फार्म दिल्या गेल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. त्यात दोन्ही उमेदवार पक्षाच्या चिन्हासाठी व पक्षाकडून निवडणूक लढण्याकरिता अडून बसल्याचे समजल्या जात आहे. तर हे प्रकरण निवडणूक निरीक्षकांकडे अथवा आयुक्तांकडे नेण्यात आल्याचे सांगतल्या जात आहे मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अथवा पक्षांकडून दिल्या गेली नाहीये.
मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू असल्याचे सांगितले जात आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची व कोअर कमिटीची बैठक सुरू असल्याचे सांगितल्या जात आहे. मात्र अद्याप पर्यंत हे समजुशकल नाही की कित्येक वर्षांपासून पक्षात एकनिष्ठतेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलून बाहेरून आलेल्या पार्सल ला उमेदवारी देण्याकरिता कोणत्या पदाधिकाऱ्याने कोर कमिटीकडे वशिला लावला असावा अथवा एकाच प्रभागात दोन उमेदवारांना कोणी एबी फॉर्म दिले असावेत..? नेमकं यामागील सदस्य यंत्र तरी काय अशा विविध चर्चेला शहरात उधाण आले आहे.
नेमक काय घडलं?
प्रभाग क्रमांक १० मध्ये सिद्धार्थ नगर स्थित राहणारे व वंचित बहुजन आघाडी चे शहर कोशाध्यक्ष सागर चावरे हे गेल्या कित्येक वर्षांपासून पक्ष वाढविण्याकरिता मूर्तिजापूरात कष्ट घेत आहेत. सागर यांनी प्रभाग क्रमांक १० मधून आपल्या पत्नी करिता वंचित चे तिकीट मागितले होते, त्यांना पक्षाकडूनही आश्वासित करण्यात आलं होत तसेच त्यांच्या कार्यावर पक्ष व प्रभागातील नागरिक ही संतुष्ट असल्याने त्यांचे तिकीट कन्फर्म मानल्या जात होते तर पक्षाने त्यांना उमेदवारी देत ए बी फार्म ही दिला मात्र उमेदवारी अर्ज नामांकन भरण्याच्या ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, भारतीय जनता पार्टी आदी विविध पक्षांमधून फिरवून आलेल्या बाहेरच्या पार्सलला ही पक्षाने उमेदवारी देत एबी फॉर्म दिल्याने गोंधळ निर्माण झाला. अखेर प्रभाग क्रमांक दहा मधील सिद्धार्थ नगर, लहारी या प्लॉट, अण्णाभाऊ साठे नगर आदी परिसरातील संतप्त १०० ते १५० नागरिकांनी आपल्या कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना घेरले पदाधिकाऱ्यांकडून संतप्त नागरिकांना २४ तासाचा अवधी मागून योग्य तो न्याय मिळेल असे आश्वासित करण्यात आले.

