अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून रकमेची केली मागणी
अधिकाऱ्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या स्वाधीन
महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात लाचखोरी आणि भ्रष्टाचार वाढला असून एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी” ना खाऊंगा ना खाने दूंगा ” म्हणत देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा विळा देशाच्या पंतप्रधानांनी उचलला असून भारत देश हा भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असून परंतु भारत देशातील महाराष्ट्र राज्यात पैसे दिल्याशिवाय सामान्य नागरिकांचे कामे होत नसल्याचे सामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे. असाच एक प्रकार महाराष्ट्र राज्यातील अकोल्या जिल्ह्यात घडला असून
अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनीबेकायदेशीर रकमेची मागणी केल्याचा आरोप अकोला जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने
तक्रारीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी खनिकर्म विभागाचा कार्यभार आपल्याकडे असल्याचे सांगून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी १९ मार्च रोजी त्यांना शासकीय निवासस्थानी बोलावले. त्यांनी तुमच्या संघाच्या प्रत्येक सदस्याकडून मला किती रक्कम वसूल करून देता. असा आरोप बिजवे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारीत केला. तसेच उद्योजकांनी अधिकाऱ्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप संभाषण असलेली
ऑडिओ क्लिप एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे सदस्य सुरेश चांडक, राजेश ठाकरे, मनोज राजगुरे, रिजवान अहमद, लखन गावंडे यांच्यासह संघाकडून अॅड. सुमित बजाज व अॅड. देवाशिष काकडही होते. आता राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री अशा लाजखोर अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

