प्रतिनिधी मूर्तिजापूर शाम वाळस्कर
मुर्तीजापुर शहरात एक लाजिरवाणी घटना घडली एक १२ वर्षीय लहान मुलगी मंगलदास बाबा नगर येथे दिनांक 05/04/2026 रोजी सायंकाळी ०६ वा. सुमारास पाण्याची कोठी भरुण आण्याकरीता गेली असता भरण्यास गेली होती, तिथे मोहम्मद मुजम्मील मोहम्मद रोशन (वय – ४० ) याने मुलीकडे वाईट नजरेने बघून त्याची अंडरविअर खाली करून त्याचे लिंग दाखवुन तू अनुसुचीत जातीचे आहे असे म्हणत तिचा विनयभंग केला त्या नंतर ती मुलगी घाबरून घरी आली तिने आपल्या सोबत घडलेल्या घटने बाबत कोणाला सांगितले नाही.पण दुसर्या दिवशी परत घरचा लोकांनी तिला त्याच ठिकाणा वरून पाणी भरण्याकरिता सांगितले तर तिने नकार दिला या वरून त्यावरून तिचा आईने तिला आरडाओरड केली मग तिने काल घडलेला संपूर्ण प्रकार तिचा आईला सांगितला त्यावरून या प्रकरणाचे बिंग फुटले व प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचला.
प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यावर काही सामजिक कार्यकर्ते व आजूबाजूचे लोक तिथे पोहचले, व तत्काळ पोलिसांनी आरोपीला अटक करून त्यावर अप क्र 357/2026 कलम 74,79 भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 12 लैंगीक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनीयम 2012, सहकलम 3(1) (W) (i) (ii),3(2) (Va), अनुसुचीत जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनीयम 1989 प्रमाणे कारवाई करत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एक गंभीर बाब अशी कि आरोपीला ठाण्यात आणल्यावर काही विशिष्ठ पक्षाचे नगरसेवक तिथे पोहोचले व असा संवेदनशील प्रकरण दाबण्याचा प्रयन्त करत होते, असे तिथे उपस्थित पत्रकार मंडळीचा लक्षात आले. सध्या मुर्तीजापुर शहरात एक चिंताजनक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा अगोदर काही नगरसेवक तेथे दाखल होतात व प्रकरण रफादफा करण्यासाठी दबाव तंत्र वापरतात या हस्तक्षेपामुळे पोलीस तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, न्याय प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता असते. कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याऐवजी अशा प्रकारे प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारांवर वेळीच नियंत्रण ठेवणे आणि निष्पक्ष तपास सुनिश्चित करणे पोलीस प्रशासनाला गरजेचे आहे.

