घरगुती वादावरून पतीने केला पत्नीवर चाकू हल्ला ..हल्ल्यात पत्नी जागीच ठार
अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डाबकी रोड गजानन नगर येथे एका पतीने पत्नीवर चाकू हल्ला करीत ठार केल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार काही घरगुती कारणावरून दोघांमध्ये घरी वाद झाला त्यानंतर मृतक महिला ही दूध आणण्यासाठी किराणा दुकानावर आली असता पतीने तिचा पाठलाग करीत भर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास चाकू हल्ला चढविला या हल्ल्यात पत्नी जागीच ठार झाली असून मंदा दीपक गुडदे असे मृतक महिलेचा नाव आहे घटनेची माहिती मिळताच दाबकी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाली होती पोलिसांनी तात्काळ आरोपी दीपक गुडदे याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

