महानगरपालिकाच्या भूखंडा वरील जागा 24 तासाच्या आत खाली करण्याचे अकोला मनपा चे आदेश
अकोला महानगरपालिकेच्या हद्दीतील महानगरपालिकेच्या भूखंडावरील जागेवरील अतिक्रमण काढून अकोला येथील नझूल भूखंड अधिग्रहणाचा प्रस्ताव तत्कालीन नगर परिषदेने महसूल विभागास दिनांक १३ 13 डिसेंबर १९८२ रोजी सादर केला होता. त्यानुसार विशेष भूसंपादन अधिकारी यांनी दिनाक ११ एप्रिल १९९६ रोजी निवाडा जाहीर केला होता. त्यामुत्तार जागेची किंमत रु. १९ लाख ४८ हजार २४२ रूपयेचा भरणा दिनांक १२ एप्रिल १९९६ व दिनांक ०५ डिसेंबर २००० रोजी महसूल विभागाकडे केलेला आहे. त्यानुसार दिनांक ३० जून २०१७ रोजी महसूल विभागाने जागेचा ताबा महानगरपालिकेस दिलेला आहे व मालमत्ता पत्रकात महानगरपालिकेच्या नांवे मालकी हक्काची नोंद झालेली आहे. उपरोक्त प्रमाणे वस्तूस्थिती असतांना जागेत अतिक्रमण करुन कच्चे शेडचे बांधकाम केलेले आहे. केलेले अतिक्रमीत बांधकाम ही सूचना मिळाल्यापासून २४ तासात स्वतः काढून घ्यावे अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २३०,२३१ अन्वये कार्यवाही करण्यात येईल अशा आदेशाची नोटीस संबंधित भूखंडावरील व्यवसायिकांना देण्यात आली आहे.
