आत्ताच्या घडीची सर्वात ही बातमी समोर आली आहे अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे मतदानाची वेळ संपल्यानंतर भारतीय जनता पार्टी च्या उमेदवाराच्या प्रतिनिधीकडून मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या संगमताने बंद दरवाजा करून भाजपा च्या उमेदवारा समोरील बटन दाबण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय.
अद्याप मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने घटने बाबत बोलण्यासाठी नकार दिलाय.
अकोल्याच्या मुर्तीजापुर येथील प्रभाग क्रमांक १ च्या पंचायत समिती कार्यालय मतदान केंद्रावर सायंकाळी वेळ संपल्यावर भारतीय जनता पार्टी उमेदवारा च्या प्रतिनिधी आणि मतदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून भाजप च्या उमेदवाराच्या समोरील बटन दाबून मतदान चोरण्याचा प्रकार समोर आलाय.
या घटने मुळे संतप्त झालेले नागरिकांनी मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन व पंचायत समिती कार्यालयासमोर मोठी गर्दी केली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रतिनिधी ह्यांना मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावरून बाहेर पाठविण्यात आलं परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रतिनिधी आणि कर्मचारी हे आतच होते आणि त्या नंतर आत भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधी व कर्मचारी यांनी संगमताने सदर प्रकार घडवून आणल्याच माध्यमांसमोर प्रत्यक्ष दर्शनी स्पष्ट केलय.
——————————————
प्रतिनिधी शाम वाळस्कर
सत्य लढा न्यूज मुर्तीजापुर

