अकोल्याच्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या मालगाडीच्या वॅगन मधून अचानक आग लागल्याची घटना घडलीये, सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी एका रेल्वे कर्मचाऱ्या च्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळलाय.
मुंबई – हावडा प्रमुख रेल्वे महामार्गवरील मध्य रेल्वे च्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पेट्रोल- डिझेलची वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या वॅगनमधून अचानक आगीचा भडका उडल्याने रेल्वे स्थानकावर एकच धावपळ उडाल्याची घटना दु. ३ वाजताच्या सुमारास घडलीये. मात्र या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी आपल्या जिवावर खेळून चतुर्थ श्रेणीच्या गॅंगमन पदावरील राजू यादव नामक कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळलाय.
