जबाबदारीची जाणीव ठेवून; विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठावे!
संजय तायडे गुरुजी
नववर्ष स्वागत उत्सव; गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
भटकर अभ्यासीकाच्या वतीने विद्यार्थ्यांना संविधान भेट
बोरगाव मंजू
आजच्या गतिमान बदलत्या काळाच्या ओघात उद्याच्या येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, ते केवळ शिक्षणातून शक्य आहे, त्या दृष्टीने विद्यार्थी दशेत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, ध्येय चिकाटी परिश्रम यश निश्चित आहे, त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून स्पर्धा परिक्षेची तयारी करून यशाचे शिखर गाठावे व आपल्या गुणवत्ता प्राप्त सह आई वडीलांचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन संजय तायडे गुरुजी यांनी केले ते स्थानिक भटकर अभ्यासीकाच्या वतीने आयोजित गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सन्मान सोहळा व नववर्ष स्वागत उत्सव दिन प्रसंगी बोलत होते,
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तायडे गुरुजी हे होते तर प्रमुख उपस्थिती दादाराव सुलताने, सिने कलावंत शाम पिपळकर, सहदेव मोहन गुरुजी, नंदकुमार देशमुख , वसंत वाघमारे,विचुंरकर, कुकडे गुरुजी, जोशी गुरुजी, नंदलाल यादव , हिम्मतराव मांगे , अभ्यासिका अध्यक्ष गजानन भटकर यांच्या सह पालक विद्यार्थी उपस्थित होते, दरम्यान सिने कलावंत शाम पिपळकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की
विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानार्जन सह जीवन मुल्य आत्मसात सह विद्यार्जन जीवनाचे मुल्य आत्मसात करून
विद्यार्थ्यांनी सकारात्मक बदल घडवून आपले जीवन उंचावेल , प्रसंगी दादाराव सुलताने, सहदेव मोहन गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व दिशा मिळावी यासाठी भटकर अभ्यासीकाच्या वतीने विद्यार्थी हितासाठी उपक्रम राबविले जातात हे स्तुत्य आहे,प्रसंगी गुणवत्ता प्राप्त शगुन मोरे,पायल बागडे या विद्यार्थ्यांना संविधान भेट देऊन गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले ,प्रसंगी विद्यार्थी, पालक व अभ्यासिका व्यवस्थापिका पुजा खेमराज भटकर सह स्पर्धा परीक्षा विद्यार्थी उपस्थित होते सुत्रसंचलन अभ्यासिका संचालक गजानन भटकर यांनी केले, आभार भटकर अभ्यासीकेच्या व्यवस्थापिका पुजा खेमराज भटकर यांनी केले

