बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नविन बायपास वाय पाँइंट नजीक धावत्या कारचे टायर फुटल्याने या अपघातात एक महीला एक पुरुष कार मधील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 29 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली, खुशरंग भिलुजी मायवाड वय ५०,
अनिता खुशरंग मायवाड वय ४८असे अपघातातील मृतांची नावे आहे तर अन्य पाच प्रवासी जखमी झाले,
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक वरून बैतुल मध्यप्रदेश परतीच्या प्रवासाला कार क्रमांक एम पी 48 झेड एच 4822 या प्रवासी वाहनातून एकुण सात प्रवासी मोनु मुरली हारोळे,शिवा मुरली हारोळे, रोहित खुशरंग मायवाड,बामी मायवाड, अनिता खुशरंग मायवाड, खुशरंग भिलुजी मायवाड, प्रवास करत होते, दरम्यान धावत्या कारचे डावीकडील टायर फुटल्याने सदर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रोडच्या कडेला दहा फूट खोलीपर्यंत पलटी झाली, या अपघातात कार मधील खुशरंग भिलुजी मायवाड वय ५०, अनिता खुशरंग मायवाड वय ४८ राहणार बैतूल मध्यप्रदेश
हे गंभीर जखमी झाले, या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला,
दरम्यान अपघात एवढा भिषण होता की अपघातानंतर कार रोडच्या कडेला दहा फूट खोलीपर्यंत पलटी झाली,ही घटना आजुबाजुला शेतात कामगिरी करत असताना सामाजिक कार्यकर्ते गजानन देशमुख, गजानन तिडके, नितीन बोपुलकर अन्य शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना मदत केली, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हेडकॉन्स्टेबल प्रमोद डोईफोडे, किशोर सोळंके,शुभम फलके, ज्ञानेश्वर जामोदे यांनी घटनास्थळी धाव घेत रोडच्या कडेला पलटी झालेल्या कार मधुन जखमींना बाहेर काढून जखमीस उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले , घटनास्थळावरून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला, पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे यांच्या सह पोलीस करीत आहेत

