प्रतिनिधी/मूर्तिजापूरनागपूर–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ग्राम कुरुम शिवारातील तीन पुलाजवळ दि.७ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. एमएच-२९-बीएफ-६०७४ क्रमांकाचा ट्रक नागपूर येथून संभाजीनगर कडे लोखंडी पाइप घेऊन जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावरील डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने पुला जवळील खोल दरीत जाऊन पडला असता अपघाताच्या धक्याने ट्रकमधील लोखंडी पाइप हे ट्रकच्या केबिनमध्ये जाऊन पडले व ते थेट चालक अनिसउद्दीन रफिकउद्दीन काझी व क्लीनर मोहम्मद रेहान मोहम्मद नाजिम दोन्ही रा.जोहर नगर बुलढाणा यांच्या अंगावर कोसळले.या गंभीर अपघातात दोघेही अत्यवस्थ जखमी होऊन जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच माना पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला.सदर अपघाताचा पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.दीपक सोळंके करीत आहेत.

