अकोला-वाशिम मार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पातुर जवळील कापसी तलाव परिसरात आणखी एक भीषण अपघात घडला आहे. ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव अमित वाघ असून तो भरतपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात अंभोरे नावाचा दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
घटनेबाबत स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.


अगोदरच लोक 30 रुपये कचरा गाडीसाठी देत नव्हते आता तर 30रुपये म्हटल्यावर आता गल्ली बोळामध्ये खुल्या प्लॉटमध्ये कचऱ्याचे लागलेले ढीग दिसतील एकदम 30 रुपयावरून पन्नास रुपये करणे ही तर सामान्य जनतेची आहे