हवामान अंदाजः 8 जुलैपर्यंत पावसाची शक्यता

हवामान अंदाजः 8 जुलैपर्यंत पावसाची शक्यता

अकोला,दि.6- भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 8 जुलैपर्यंत जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  विज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा.  वारा वादळाचे स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

 

आदिवासी मुला- मुलींचे शासकीय वसतीगृह; प्रवेश सुरु

अकोला दि.6 :- आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह  क्रमांक  1 व 2 अकोला येथील रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे, असे वसतीगृहाचे गृहपालक यांनी कळविले आहे. या वसतीगृहात गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. इयत्ता 11 वी, डिप्लोमा, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.  त्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज www.swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज भरावा व अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे  वसतीगृहावर जमा करावे. त्यात बोनाफाईड सर्टिफिकेट, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बॅंक खाते पत्र, वैद्यकीय प्रमाण पत्र, आधार कार्ड तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जावर स्वतःचा व कुटुंबातील जबाबदार व्यक्तीचा मोबाईल क्रमांक नमूद करावा. विद्यार्थ्यांचे अर्ज आदिवासी मुलांचे वसतीगृह क्रमांक १, तोष्णिवाल ले आऊट, अकोला, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह क्रमांक २, दामले मार्केट, अकोला. आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह जुने क्रमांक 1 कृषी नगर, अकोला व आदिवासी मुलांचे वसतीगृह नवीन क्रमांक २, कीर्ती नगर, अकोला येथे सादर करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news