आजच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे खैर मोहम्मद प्लॉट येथील नाल्यात बुडून बालकाचा मृत्यू !

आजच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे खैर मोहम्मद प्लॉट येथील नाल्यात बुडून बालकाचा मृत्यू !

 शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे शहरात नाले साफसफाई न झाल्यामुळे बहुशांक भाग जलमय!

 आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोल्या शहरात बहुशांक भाग हा जलमय झाला शहरात मनपाच्या वतीने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मनपा आयुक्त तथा प्रशासन कविता द्विवेदी यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नाले साफसफाई करण्याचे आदेशित केले मात्र क्षेत्रीय अधिकारी यांनी फक्त कागदावर नाले साफसफाई केल्याचे आज दिसून आले. अकोला शहरात पावसाची संततधार सुरू असून. नदीचे नाले तुंबले आहेत. या पावसात एक धक्कादायक घटना घडली आहे. नाल्याच्या पाण्यात १० वर्षांचा मुलगा वाहून गेल्याचे वृत्त समोर आले आहे.या मुलाचे नाव जियान अहमद इक्बाल अहमद असे असून तो खैर मोहम्मद प्लॉट येथे राहणारा १० वर्षांचा असून तो रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये खेळत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच जुने शहर पोलिस तसेच अग्निशमन विभागाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणची लाईन गेल्यामुळे अंधारात असून शोध मोहिमेत अडथळे येत आहेत, तरीही काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच मनातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे सदर बालक पाण्यात वाहून गेल्याची चर्चा खैर मोहम्मद प्लॉटमध्ये सुरू होती ‌. संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी खैर मोहम्मद प्लॉटमधील नागरिकांनी केली आहे.

आज झालेल्या पावसामुळे डाबकी रोड परिसर. जठार पेठ परिसर. मोठी उमरी परिसर. गुरधी परिसर. खडकी परिसर. न्यू तापडिया नगर. जवाहर नगर. सुधीर कॉलनी. गोयंका लेआउट.कुशीनगर. जुने आरटीओ ऑफिस परिसर. सिंधी कॅम्प परिसर. रतनलाल प्लॉट .आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरामध्ये तसेच रस्त्यावर पावसाचे पाणी पाहावयास मिळाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news