अल्पवयीन मूलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता !

अल्पवयीन मूलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता !

वर्ष २०१९ मध्ये पोलीस स्टेशन उरळ येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार मुलीच्या वडीलांनी दाखल केली होती. त्या आधारावर पोलीस स्टेशन उरक येथे भा. द. वी वी कलम ३७४अ ३७४ड व पोक्सो कायद्याची कलम ११ व १२ अन्वये आरोपी दिगांबर उगले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीमध्ये आरोप लावण्यात आले होते कि आरोपी दिगांबर उगले हा मागील एक वर्षापासून त्यांची मुलीचा पाठलाग करीत होता व घटनेच्या दिवशी संध्याकाळी त्यांची मुलगी तुलसीमाईला दिवा लावत असतांना त्यांनी आरोपीला तिच्याकडे वाईट नजरेने पाहतांना पहिले होते. यावरून मुलीच्या वडिलांनी आरोपी विरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीच्या आधारे पी. एस. आई. श्री. किशोर मावस्कर यांनी तपास हाती घेवून आरोपी विरुद्ध भा. द. वी ची कलम ३५४अ, ३५४ड व पोक्सो कायद्याची कलम ११ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

सदर प्रकरण अकोला येथील वी. संयुक्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस.पी. गोगरकर यांच्या ज्यायालयात चालविण्यात आला. सदर प्रकरणात एकूण पांच साक्षीदार तपासण्यात आले. परंतु साक्षीदारांचे बयाणातून सरकार पक्षाकडून आरोप सिद्ध होऊ शकले नाही, म्हणून वी. न्यायालयाने आरोपी दिगांबर उगलेची वरील प्रकरणात भा. द.वी. वी कलम ३७४४, ३७४ड व पोक्सो कायद्याची कलम १२ व १२ मध्ये दि • ०५.०७ २०२३ रोजी निर्दोष सुटका केली.

सदर प्रकरणात आरोपीतर्फे अकोला येथील एड. पप्पू मोरवाल, एड. राकेश पाली, एड. आनंद साबळे, एड. नागसेन तायडे यांनी काम पहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news