राजपथ कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आक्रमक शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न

राजपथ कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आक्रमक शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न

आ.हरिष पिंपळेच्या मध्यस्थीने आंदोलन मागे

नुकसान पाहिणीसाठी तहसीलदार लवकर न आल्याने रास्ता रोकोचा पवित्रा
बोरगाव मंजू

एकीकडे दुबार तिबार पेरणीचे संकट ओढवले असतांना राजपथ इन्फ्रा लि क च्या हलगर्जी पणा मुळे अस्थायी पूल तुटून पूलामुळे तुंबलेले पाणी थेट मुस्तफापूर, दाळंबी, कोळंबी, मिर्झापुर, कुरणखेड आदी भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. म्हणून याबाबत भाजपचे प्रशांत ठाकरे आ हरिष पिंपळे याच्यासह तहसीलदार सुनील पाटील यांच्या कानावर हा प्रकार टाकण्यात आला. परिसरातील सर्व शेतकरी जमा झाले.मात्र नुकसानीची महसूल विभाग दखल घेत नसल्याचे निदर्शनास येते असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको प्रयत्न केला असता आ. हरिष पिंपळे याचा मध्यस्थी ने हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान विधानसभेत लक्षवेधी मांडून शासनाचे लक्ष वेधले व नुकसान भरपाई ची मागणी केली तर अकोला तहसीलदार यांना प्रकरणाचे गांभीर्य सांगूनही प्राथमिक अहवाल येऊ द्या असे म्हणणाऱ्या तहसीलदार वर कार्यवाही करण्याची मागणी विधानसभेत केली.
तर उशिरा तहसीलदार दाखल होत पुरग्रत भागाची पाहणी केली सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले तर राजपथ कंपनीच्या अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news