किराणा बाजार आणि शिवसेना वसाहत मध्ये मनपाव्दारा कीट नाशक फव्वारणी आणि पाऊडरचा  छिरकाव.

किराणा बाजार आणि शिवसेना वसाहत मध्ये मनपाव्दारा कीट नाशक फव्वारणी आणि पाऊडरचा  छिरकाव.

अकोला दि. २३ जुलै २००३ – अकोला शहरामध्ये २१ आणि २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील सखल भागात पाणी साचला होता. यामध्ये हायवे वरील होलसेल किराणा बाजार आणि शिवसेना वसाहतीतील ब-यास घरांमध्ये पाणी शिरले असल्याने या भागात साथरोगाच्या अनुषंगाने नियंत्रण व रोकथामासाठी विशेष लक्ष घालून उपाययोजना करण्याच्या मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने आज दि. २३ जुलै रोजी मनपा वैद्यकीय आरोग्य विभागाव्दारे सदर भागातील पाहणी करण्यात आली असून किराणा बाजार आणि शिवसेना वसाहत येथील रिकाम्या प्लॉटमध्ये गप्पी मासे सोडण्याचे नियोजन करण्यात आले तसेच कीटनाशक उपाऊडरची आणि कीटनाशक फव्वारणी करण्यात आली आहे, तसेच या भागातील नागरी आरोग्य केंद्रांच्या मार्फत पुछील काही दिवस या भागात साथरोग नियंत्रणासाठी विशेष लक्ष देऊन त्या दिशेने कार्य करण्यासाठी सुचना देण्यात आल्या.

          यावेळी पश्चिम झोनचे सहा.आयुक्त दिलीप जाधव, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनुप चौधरी, साथरोग व मलेरिया विभागचे डॉ.नितिन गायकवाड, प्रकाश राठोड, अंकुश धुड, रायबोले, गोंधळेकर यांचेसह पश्चिम झोन कार्यालय आणि मनपा वैद्यकीय आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news