दहीहांडा येथे लोकवर्गणीतून उभारला छत्रपती शिवाजी महारजांचा पुतळा

दहीहांडा येथे लोकवर्गणीतून उभारला छत्रपती शिवाजी महारजांचा पुतळा

दहीहंडा : अकोला तालुक्यातील दहीहंडा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी सर्वधर्मीयांनी पुढाकार घेत तब्बल २५ लाखांची लोकवर्गणी उभी केली आहे. रयतेच्या राजा महाराजांचा पुतळा १२ फूट उंच व १५ क्विंटल अष्टधातूचा पुतळा गुरुवार, 13 ऑगस्ट रोजी स्थापन करण्यात आला. याआधी गावातून ढोल- ताशांच्या गजरात अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. तरुणाईच्या पुढाकाराला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पाहता पाहता २५ लाख रुपयांचा निधीही संकलित झाला. छत्रपती संभाजीनगर येथे पुतळा तयार केला. हा पुतळा नवीन संसद भवनावरील अशोकस्तंभ तयार केलेल्या मुर्तिकार सुनील देवरे यांच्याकडे तयार केल्याची माहिती आहे. जल्लोषात दहीहांडा फाटा पासून मोटरसायकल रयली काडणायात आली व शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे गजर लावण्यात आले तसेच दहीहंडा गावात पोचता शिवभक्तांनी मोटार सायकल ठेऊन दिले व
सांप्रदायिक भजन मंडळ पंचमुखी भजन मंडळ. दहीहांडा,श्री रुपणाथ भजन मंडळ, श्री रुपणाथ बाबा बँड पार्टी तसेच अनेक सांप्रदायिक भजन मंडळांनी देखील सहभाग घेतला

प्रशस्त बगीचा तयार करणार!

दहीहंडा येथील आठवडी बाजारात सामाजिक उपक्रमाकरिता प्रशस्त बगीचा तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी हॉलमध्ये शिवरायांच्या जीवनचरित्राबद्दलची फोटोसह माहिती लावण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी यावेळी दिली.

मिरवणुकीनंतर रात्री उशिरा पुतळ्याची स्थापना केली. शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते विधिवत प्रजन करण्यात आले.

जय शिवाजी, जय भवानी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news