१ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात अटक!

१ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात अटक!

महावितरण कंपनीच्या जुने शहरातील गजानन नगरातील असलेल्या उपविभाग क्रमांक दोनमधील तक्रार निवारण केंद्रात कार्यरत असलेल्या कनिष्ठ कार्यालयीन सहायकास १ हजार रुपयांची लाच घेताना खदान पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी रंगेहात अटक केली. सदर कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. या लाचखोर आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुने शहरातील डाबकी रोडवरील गजानन नगरामध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या जिल्हा तक्रार निवारण केंद्र क्रमांक ११ मध्ये कार्यरत असलेला सचिन भाऊराव मुंडे (३७) या कनिष्ठ कार्यालयीन सहायकाने तक्रारदाराच्या सोलार ग्रुप टॉप बसवून दिल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट नोंद करण्यासाठी तक्रारदारास एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी कनिष्ठ सहायक सविन मुंडे याला लाच घेताना रंगेहात अटक केली. त्याच्याकडून एक हजार रुपयाची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी लाचखोराविरुद्ध खदान पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे आणि अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलिस अंमलदार राहुल इंगळे, किशोर पवार, प्रदीप गावंडे, श्रीकृष्ण पळसपगार, नीलेश शेगोकार . संदीप काळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news