अकोला महानगरपालिका पश्चिम झोनमधील खोदकामादरम्यान ऐतिहासिक वस्तू मिळाल्याने जुने शहरात एकच उडाली खळबळ…

अकोला महानगरपालिका पश्चिम झोनमधील खोदकामादरम्यान ऐतिहासिक वस्तू मिळाल्याने जुने शहरात एकच उडाली खळबळ…

अकोला महानगरपालिका पश्चिम झोन परिसरातील किल्ला चौक पासून ते पोळा चौक पर्यंत जात असलेल्या रस्त्यावर अकोला महानगरपालिकेच्या वतीने नाला बांधकाम खोदकाम करताना ऐतिहासिक पुरातन काही वस्तू मिळाल्याने अकोला शहरात एकच खळबळ उडाली. यावेळी जुने शहर परिसरातील नागरिकांनी हे ऐतिहासिक वस्तू पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली होती.आणि खोतकाम करत असताना काही वस्तू मिळाल्याची माहिती जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हळकर यांना मिळतास त्यांच्या चमूसह ते घटनास्थळी दाखल झाले होते. महापालिका वतीने करण्यात येणारे खोदकाम तुर्तास स्थगित करण्यात आले असून या ऐतिहासिक वस्तूची पाहणी महसूल प्रशासन वतीने करण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी या पुरातन ऐतिहासिक वस्तू पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर ही गर्दी पांगवण्याकरिता जुने शहर पोलीस शर्तीचे प्रयत्न करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news