व्याळा येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा.सुजातजी आंबेडकर यांनी दिली सांत्वन भेट..

व्याळा येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा.सुजातजी आंबेडकर यांनी दिली सांत्वन भेट..

बाळापूर दि. ५ ऑगस्ट – वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा.सुजातजी आंबेडकर यांनी व्याळा येथील वंचित बहुजन आघाडी चे बाळापूर तालुका सह प्रसिद्धी प्रमुख संदीप दामोदर यांच्या घरी सांत्वन भेट घेतली.त्यांच्या १२ वर्षीय मुलाचे दुर्धर आजाराने निधन झाले होते.हिंदुजा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ला संपर्क करुन वैद्यकीय मदत करु असे आश्वासन दिले.
आणि संदीप माणिक वानखडे यांचे ब्लड कॅन्सर या आजाराने निधन झाले होते. या दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
त्या दुःखात दोन्ही परिवारांना सुजातजी यांनी धीर दिला आणि दोन्ही कुटुंबांचे सात्वन केले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news