राहेर अडगाव ग्राम पंचायतच्या महिला सरपंच अपात्र पतीचा हस्ताक्षेप व लाचेची मागणी करणे भोवले

राहेर अडगाव ग्राम पंचायतच्या महिला सरपंच अपात्र पतीचा हस्ताक्षेप व लाचेची मागणी करणे भोवले

निखिल इंगळे सह किरण निमकंड – : पातुर तालुक्यातील गट ग्रामपंचायत राहेर अडगाव च्या महिला सरपंच राजश्री अशोक बोराळे, यांना अमरावतीच्या अपर आयुक्तांनी नुकतेच अपात्र केल्याची कारवाई केली आहे. गट ग्राम पंचायत राहेर अडगाव अंतर्गत कंत्राटदाराने शेत रस्त्याच्या कामासाठी साहित्य पुरवठा केला होता, या कामाचा देयक काढण्यासाठी सरपंच राजश्री बोराळे,यांचे पती अशोक सहदेव बोराळे यांनी पत्नी राजश्री बोराळे यांच्या मूकसंमतीने कंत्राटदाराला एक लाख २७ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती, कंत्राटदार आरिफ पठाण यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सरपंच पती अशोक सहदेव बोराळे व तत्कालीन सचिव राजेंद्र मेहरे यांना ८ जून २०२२ रोजी अटक करून पातुर पोलिसात गुन्हा दाखल केला होता, तसेच सरपंच पती ग्राम पंचायतच्या मासिक सभेच्या वेळी व पत्नी सरपंचाच्या खुर्चीवर बसतात, ग्राम पंचायतच्या कामात हस्तक्षेप करतात, असा आरोप गट ग्रामपंचायत राहेर अडगावचे सदस्यांनी विभागीय आयुक्ताकडे दाखल केलेल्या याचिकेतून केला होता, अपर आयुक्तांनी सदस्यांनी केलेले आरोप मान्य करून सरपंच राजश्री बोराळे, यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र केले आहे.

या सदस्यांनी केली होती याचिका दाखल!
सरपंच राजश्री बोराळे यांचे पती अशोक बोराळे यांचा हस्ताक्षेप व लाचेची मागणी केल्याप्रकरणी सदस्य श्रीधर अभिमन्यू पाचपोर, शे. कासम शे. अब्बास, सरला ज्ञानेश्वर कोळसे, अर्चना रमेश ढोरे, ज्योती सागर वानखडे, या पाच सदस्यांनी आयुक्तकडे याचिका दाखल केली होती.

 

प्रतिक्रिया
अपर आयुक्तांनी मला अपात्र केल्याबाबत त्यांच्या आदेशाला आव्हान देत लवकरच ग्राम विकास मंत्र्यांच्या न्यायालया दाद मागण्यात येईल.
राजश्री बोराळे तत्कालीन सरपंच गट ग्राम पंचायत राहेर अडगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news