भोपळे विद्यालयात मेरी माटी मेरा देश या उपक्रमाचे आयोजन

भोपळे विद्यालयात मेरी माटी मेरा देश या उपक्रमाचे आयोजन

मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा

तेल्हारा=स्वातंत्र्याच्या शताब्धी वर्षानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी युवकांनी पंचप्राण शपथ घेतली. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकार व्दारा पुरस्कृत नेहरू युवा केंद्र अकोला जिल्हा कार्यालय व आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड व सहदेवराव भोपळे विद्यालयातील हरित सेनेच्या वतीने करण्यात आले होते.याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे, प्रमुख उपस्थितीत जिल्हा मराठी भाषेचे अशासकीय सदस्य डॉ.मयुर लहाने हे होते. या उपक्रमाच्या सुरवातीला मातृभूमीच्या मातीचे पूजन करून करण्यात आली. ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियान अंतर्गत पंचप्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, शूरवीर यांना वंदन करण्यात आले. भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्य दक्ष राहायचं आहे.
नागरिकां चे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे, ही पंचप्राण उपस्थितांनी घेतली. अध्यक्षीय मनो गतात स्नेहल भोपळे यांनी ‘मेरी माटी मेरा देश’ ची शपथ विधी निमित्त बोलताना देशभक्ती, निसर्ग संरक्षण, आत्म निर्भर इत्यादी विषयांवर संबोधित केले. भोपळे कॉलेजच्या प्राचार्या रजनी वालोकार यांच्या मार्ग दर्शनात संपन्न झालेल्या या देशभक्ती प्रेरक उपक्रमा साठी नेहरू युवा मंडळ व , आकांक्षा युवा मंडळाचे पदाधिकारी, राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी, कौन्तेय फिटनेस जिमचे संचालक अक्षय मोरखडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news