कली ने राजा परिक्षीतच्या डोक्याचा ताबा घेतल्याने अनर्थ घडला श्रीमद भागवत कथेत विषद केला महिमा

कली ने राजा परिक्षीतच्या डोक्याचा ताबा घेतल्याने अनर्थ घडला श्रीमद भागवत कथेत विषद केला महिमा

अकोला. स्व कृपाशंकर मिश्रा यांच्या स्मरणार्थ स्थानिक खाटू श्याम मंदिर, अकोला येथे 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम येथिल नितिनदेव महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून मिश्रा परिवार अकोला यांच्या वतीने आयोजित श्री खाटूश्याम बाबा मंदीर अकोला येथे आज शनीवारी भागवत कथेचे तिसरे पुष्प गुंफताना नितिनदेव महाराज यांनी राजा परिक्षीत यांच्या डोक्यावर मुकुट मार्फत कली ने ताबा घेत भूतलावर अनर्थ घडवणे सुरू केले असुन अजूनहीम्हाताऱ्या आई वडील यांना लाथा मारल्या जात आहे मात्र वयाच्या पाचव्या वर्षी भक्त ध्रुवला देव दर्शन झाल्याने त्याचे जिवन धन्य झाले आहे देव भक्तांचे कल्याण करण्यासाठीं भक्तांच्या चांगल्या कर्माची वाट पाहत असतात देवाला संधी मिळताच भक्तांचे कल्याण केले जाते त्यामुळे भगवंताचे नाम आणि कीर्तन, भजन ऐकून भक्तांनी कल्याण करून घ्यावे असा उपदेश केला.

आज देव दर्शन मिळविण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जातात मात्र देव दर्शन मिळविण्याची ताकद नाम जप आणि कीर्तनात आहे देव नाम जप किंवा कीर्तन भजन ऐकून यज्ञ, हवन केल्यानंतर चे पुण्य मिळते देव दर्शनासाठी भक्ताची खरी श्रद्धा आणि त्याग आवश्यक आहे अश्या भक्तांना देव स्वतः दर्शन देतात असे विवीध दृष्टांत देऊन सांगितले या भागवत कथेत दररोज आयोजक व भाविक भक्तांच्या वतीने विवीध धार्मिक जिवंत देखावे सादर करण्यात येत आहेत कथेच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा देखावा तर काल शुक्रवारी शंकर पार्वती यांचा देखावा उभा करण्यात आला होता आज कथेच्या तिसऱ्या दिवशी हिरण्या कश्यप, भगवान नृसिंह आणि भक्त प्रल्हाद यांचा देखावा उभा करण्यात आला होता कथावाचक चित्रकूटधाम निवासी श्री नितीनदेव महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद भागवत कथा सांगितली जात आहे . भागवत कथेची वेळ दुपारी 2 ते 6 अशी ठेवण्यात आली आहे.या कथेला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमद भागवत कथा आयोजक मिश्रा परीवार यांच्या वतीने करण्यात आले आहे ही भागवत कथा यशस्वी करण्यासाठी अरुण शर्मा, नितिन मिश्रा, सूरज भिंडा, दिनेश श्रीवास, दिपक अग्रवाल, अनिल भुटियानी गोपाल लव्हाले, गणेश बुंदेले, पिंटू मिश्रा हे आपली सेवा देत आहेत तर मंच संचलन महेन्द्र जोशी करत आहेत.

व्रुद्ध यांना सन्मानाची वागणूक द्या

भारतीय संस्कृती मध्ये व्रुद्ध माता पित्यांची सेवा केल्याने मोठें पुण्य पदरात पडते सोबतच आयुष्य जगण्यासाठी त्यांचें अनुभव मार्गदर्शक ठरतात त्यामुळें आपले जिवन सुकर जगण्यासाठी व्रुद्ध यांना सन्मानाची वागणूक द्या असा उपदेश चित्रकूट धाम येथिल नितिनदेव महाराज यांनी भागवत कथेत उपस्थीत भाविकांना केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news