साद माऊंटेनियर्स, मुंबई च्या गिर्यारोहकांचे दुहेरी यश!

साद माऊंटेनियर्स, मुंबई च्या गिर्यारोहकांचे दुहेरी यश

प्रथमेश बाणखेले, (पुणे) आणि अश्विन दाते, (अकोला) यांनी एकाच दिवसात सर केली दोन हिमालयीन शिखरे !

साद माऊंटेनियर्स, मुंबई ही IMF नवी दिल्ली व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संलग्न अशी गिर्यारोहण संस्था असून 1986 पासून या क्षेत्रात कार्यरत आहे आणि भारतभर तिचे 450 पेक्षा जास्त सभासद आहेत. साद माऊंटेनियर्स संस्थेने दि. 11 ते 26 ऑगस्ट 2023 दरम्यान संस्थेची 32 वी गिर्यारोहण मोहीम , लेह-लडाख भागातील, मार्खा व्हॅली परिसरात Mt. Dzo Jongo West ( 6280 M/ 20,724ft.) आणि Mt. Dzo Jongo East. (6,220mtr./20,526ft.) या दोन शिखरावर आयोजित केली होती. टिममध्ये सादचे, संस्थेचे आजिव सदस्य, आकोला येथील अश्विन दाते, पूण्यातील डॉ.रघुनाथ गोडबोले, प्रथमेश बाणखेले, अंजली किबे, सिध्दार्थ, आणि कृतीका असे एकूण 6 गिर्यारोहक सामील झाले होते. प्रथमेश आणि अश्विन यांनी 22 ऑगस्टला सकाळी 6.30 वाजता Mt. Dzo Jongo West ( 6280 M/ 20,724ft.) हे शिखर आरोहण केले आणि तेथे तिरंगा व साद संस्थेचा ध्वज फडकवला. सोबतच डॉ. गोडबोले व अंजली किबे यांनी सकाळी 7 वाजता Mt. Dzo Jongo East. (6,220mtr./20,526ft.) या दुसऱ्या शिखरावर आरोहण करून तिरंगा व सादचा ध्वज फडकवला.
दोन्ही टीमने आपापली कामगिरी चोखपणे करून ही 32 वी गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पार पाडून सादच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. सिध्दार्थ आणि कृतिका यांनी मोहिम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लागणारी सर्व सपोर्ट व्यवस्था बेसकँप वरून समर्थपणे सांभाळून मोहीम यशस्वी होण्यात मोलाची कामगिरी बजावली.
प्रथमेश आणि अश्विनचा डबल धमाका…
या दरम्यान प्रथमेश आणि अश्विन Mt. Dzo Jongo West ( 6280 M/ 20,724ft.) हे शिखर सर करून खाली येत असतांना बाजूला , कनेक्टेड रिजला असलेल्या Mt. Dzo Jongo East. (6,220mtr./20,526ft.) हे शिखर बघत होते. जणू ते शिखर यांना खुणावत होते. वातावरण खुले व अनुकूल होते. त्याचा फायदा घेवून हेही शिखर पादाक्रांत करायचे असा दोघांनी निर्णय घेतला. त्यांचा निर्धार व हिम्मत यांनी रंगत आणली आणि हे दोन साद विर 10 वाजता Mt. Dzo Jongo East वर समिट ला पोहोचले. तेथेही त्यांनी तिरंगा आणि साद चा ध्वज अभिमानाने फडकवला. मोहीम फत्ते झाली. एकाच दिवशी दोन हिमालयीन शिखरे सर करण्याचा अनोखा पराक्रम साद माऊंन्टेनिअर्स , मुंबई च्या ह्या ३२ व्या शिखर मोहीमेत प्रथमेश आणि अश्विन यांच्या नावे कोरला गेला. यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अश्विन दाते हे अकोला जिल्हा माउंटेनरिंग असोसिएशन चे पदाधिकारी असून त्यांचे अकोला येथे अश्विन क्लीनिंग सर्विसेस म्हणून व्यवसाय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news