नवान्ह पारायणाची अर्धशतकी वाटचाल कौतुकास्पद. श्री. ज्ञानेश्वर महाराज वाघ.

नवान्ह पारायणाची अर्धशतकी वाटचाल कौतुकास्पद. श्री. ज्ञानेश्वर महाराज वाघ.

मनोज भगत
तेल्हारा तालुका प्रतिनिधी

परंपरा निर्माण करणे सोपे परंतु ते अनाव्रत टिकवणे मात्र अत्यंत कठीण असते . कुठलीही परंपरा अनस्युत होण्याकरिता तिच्यामागे प्रथमतः परंपरा निर्मात्याची निष्ठा , ती हयात भर टिकवण्यास एवढे निर्नित्य प्रेम व तत्पश्यात ती अनशस्यूत टिकण्यासाठी निर्मात्याचा आशीर्वाद असला तरच परंपरा टिकत असतात ‌. नाहीतर केवळ आरंभ शूर व्यक्तिमत्त्वांची समाजात आज काही कमतरता नाही . गत ४६ वर्षापासून परम श्रद्धेय ब्रह्मलीन आचार्य श्री वाच्यस्पतिजी महाराज शुक्ल यांनी चालू करून दिलेल्या श्री रामचरित्रमानस सामूहिक नवान्ह पारायणाची अर्धशतकी वाटचाल अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवपूर्ण उद्गार श्री . भ. प. भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी काढले .
ते आज पंचायत धर्मशाळा तेल्हारा येथे २१ l ८ते २९l ८ l२०२३ पर्यंत गत ४६ वर्षापासून आयोजित होत असणाऱ्या श्रीरामचरित्रमानस सामूहिक नवान्ह पारायणातील गोस्वामी तुलसीदासजींच्या जयंती पर्वावर प्रवचन प्रसंगी बोलत होते .
ते पुढे म्हणाले की ! गोस्वामी तुलसीदासजींनी मुळात संस्कृतात ग्रंथीत असलेल्या रामायणाला आपल्या मातृभाषेत आणून लोक सुलभ करण्याचे मत्कार्य केले. तत्पश्यातच रामायण नामक महाकाव्य केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले. आज रोजी संपूर्ण जगात दोनशे पेक्षाही अधिक रामायणाच्या संहिता पाहण्याकरता मिळतात . असे असले तरीही श्रीमद वाल्मिकी रामायणा नंतर तुलसीजी लिखित श्रीरामचरित्रमानसाची लोकप्रियता ही सर्वाधिक आहे यातील मात्र शंका नाही . वाल्मिकी रामायण ही इतिहास दृष्टी असून तुलसीकृत रामायण ही भाव दृष्टी आहे . समाज माणसांमध्ये निष्ठा निर्माण करण्याकरिता इतिहासदृष्टी पेक्षा भावदृष्टी अत्यंत महत्त्वाचे असते . आई व मुलाच्या संभाषणातील शब्दांच्या अर्थांपेक्षा भाव महत्त्वाचे असतात तद्वत तुलसी रामायण हे माय लेकातील संवादाप्रमाणे अत्यंत भावपूर्ण असून श्रीरामभक्तीचे व तत्त्वज्ञानाचे आगरी असल्याचेही ते म्हणाले. सदर्हू कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या प्रमाणात होवो असा आशावाद व्यक्त करून , भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेला शुभेच्छा देत त्यांनी प्रवचनाला पूर्णविराम दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news