मोफत कृत्रिम पाय हात जोडणी शिबिरात तब्बल 326 रुग्णांची नोंदणी

मोफत कृत्रिम पाय हात जोडणी शिबिरात तब्बल 326 रुग्णांची नोंदणी

अकोला-महाराष्ट्र प्रादेशिक मारवाड़ी संमेलनाच्या वतीने व स्थानीय उदय शाखा,सक्षम अकोला, साधु वासवानी ट्रस्ट,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तथा अग्रसेन भवन ट्रस्टच्या विशेष सहकार्याने महानगरात रविवार दि.27 आगस्ट रोजी सकाळी 9 वाजता स्थानीय जिल्हा परिषद रस्त्यावरील अग्रसेन भवन येथे होणाऱ्या मोफत कुत्रीम पाय हात शिबिरासाठी राजभरातील विविध जिल्ह्यातील तब्बल 326 महिला पुरुष व बच्चे कंपनीची नोंदणी झाली असल्याची माहिती देण्यात आली.शनिवारी स्थानीय अग्रसेन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत संमेलनाचे माजी प्रांतीय पदाधिकारी निकेश गुप्ता यांनी दिली. अग्रसेन भवन ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल, मारवाडी युवा मंचचे प्रांतीय महामंत्री मनोज अग्रवाल, साधू वासवानी ट्रस्ट पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद जाधव, सक्षम चे महामंत्री वैभव कुलकर्णी, उदय शाखेचे अध्यक्ष सीए प्रणव टेकडीवाल,सचिव सीए तेजस चांडक,प्रकल्प प्रमुख सीए कुशल गोयनका, संतोष छाजेड यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती देण्यात आली.रविवारी आयोजित या शिबिरात अनेक जिल्ह्यातील दिव्यांग रुग्णांची नोंदणी व अंगाचे माप घेऊन पढील सप्टेंबर महिन्यात या दिव्यांगांना कुत्रीम हात पाय बसविण्यात येणार आहेत.हे कुत्रीम हात व पाय आधुनिक फाइबरने निर्मित असून कार्य करण्यास अत्यंत सुलभ आहेत. यामुळे कोणताही दिव्यांग वाहन चालवू शकतो अथवा कोणतेही कठीण काम करु शकतो. अपघात, मधुमेह, गैंग्रीन तथा अन्य कारणामुळे आलेल्या अपंगत्वला दूर करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून यात साधु वासवानी ट्रस्ट पुणेची वैद्यकीय चमू गरजू महिला,पुरुष दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात व पाय बसविण्यासाठी त्यांची अंग तपासणी व अंगाचे माप घेणार आहेत. या शिबिरात आतापर्यंत अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ ,अमरावती, नागपूर, चंद्रपूर,वर्धा, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, जळगाव येथील तब्बल 326 महिला पुरुष बच्चे कंपनीची नोंदणी झाली असून आज शिबिर दिनी पण आलेल्या रुग्णांची नोंदणी करून त्यांचे माप घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिबीर स्थळी आलेल्या सर्व रुग्णांची चहा व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी योगेश शांडील्य,आशिष सारडा,प्रतीक अग्रवाल,मोहित अग्रवाल, यश शिंगानिया, कुशल तापडिया, शुभम बियाणी, राहुल चितलांगे, हर्ष तापडिया समवेत महाराष्ट्र प्रादेशिक मारवाड़ी संमेलन, उदय शाखा,सक्षम अकोला, साधु वासवानी ट्रस्ट,पुणे, अग्रसेन भवन ट्रस्ट चे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news