अकोला मनपाने खाजगी कंपनी ला करवसुलीचा दिलेला ठेका त्वरित रद्द करावा …. मदन भरगड

अकोला मनपाने खाजगी कंपनी ला करवसुलीचा दिलेला ठेका त्वरित रद्द करावा …. मदन भरगड

अकोला मनपाने थकबाकी ( एन पी ए) असलेल्या करवसुलीचाच ठेका काढावा … मदन भरगड

अकोला :- अकोला महागर पालिकेनी अकोला शहरातील सर्वच मालमत्ताचे नव्याने मोज माप करुन पुनर्मूल्यांकन करणे, करवसुली करणे तसेच मनपाच्या इतर विभागातील हि करवसूली करण्याचे कार्याध्यादेश स्वाति इंड्रस्ट्रीज या खाजगी कंपनी ला दिला आहे, जे अत्यंत चुकीचे व ग़ैरकायदेशीर आहे, अशी प्रतिक्रिया माजी महापौर मदन भरगड यांनी दिली आहे.

कारण मनपाने वर्ष 2016 ते 2022 या 5 वर्षा करिता स्थापत्य अमरावती या खाजगी कंपनी मार्फ़त अकोला शहरातील सर्व मालमत्ताचे प्रत्यक्ष मोजमाप करुन पुनर्मूल्यांकन करुन नवीन करआकरणी केली होती हे सर्व कार्य कण्याकरिता अकोला मनपाने स्थापत्य कंपनीला कोटयावधि रूपयाचे बिल हि दिलेले आहे.

स्थापत्य अमरावती या कंपनी द्वारा अकोला शहरातील मालमत्तेचा केलेला मोजमापाचा सम्पूर्ण रेकॉर्ड मनपा मधे उपलब्ध आहे, असे असताना मग परत त्याच मालमत्तेच्या मोजमाप करण्याचे कार्य स्वाति इंड्रस्ट्रीज या कंपनीला देण्या मागे मनपाचे काय औचित्य अशु शकते, असा प्रश्न माजी महापौर मदन भरगड यांनी उपस्थित केला आहे .

मोठ मोठे बैंक असो की कोणती कंपनी असो जी वसूली त्यांच्या कर्मचारी व अधिकाऱ्या कडून होत नाही अश्या थकबाकी (एन पी ए )च्या वसूलीचेच ठेके खाजगी व्यक्ति किंवा कंपनीला दिल्या जाते.

अकोला मनपाच्या आज पर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर असे दिसते की मनपाचे कर्मचारी व अधिकारी मालमत्ता कराची व इतर कराची वसूली जवळपास 50 ते 60 टक्कया पर्यंत करत आलेले आहे. तसेच शहराचे हजारों नागरिक अशे आहे कि जे स्वतहुन मनपाचा टैक्स नियमित भरतात.

अकोला मनपाची ज्या थकबाकी (एन पी ए ) कराची वसूली कर्मचारी व अधिकारी करू शकत नाही अश्याच थकबाकी (एन पी ए ) करवसुलीचे कार्य स्वाति इंड्रस्ट्रीज दिले पाहिजे.

करवसुली साठी मनपा कड़े भरपूर कर्मचारी व अधिकारी आहे जे 50 ते 60 टक्के कर वसुली करू शकतात तरी पण सरसकट मनपाच्या सम्पूर्ण कर वसूलीचा ठेका स्वाति इंड्रस्ट्रीज देणे म्हणजे जनतेच्या घामाचा काष्टाचा करोड़ो रूपया ठेकेदाराच्या घश्यात टाकणे आहे तसेच हा आर्थिक गुन्हा सुधा आहे असे मत माजी महापौर मदन भरगड यांनी मांडले आहे,
अकोला मनपाच्या ज्या थकबाकी कराचीवसूली त्यांच्या कर्मचारी व अधिकाऱ्या कडून होउ शकत नही फक्त अश्याच करांच्या वसूली साठी मनपाने कंत्राट कढावे सरसकट सम्पूर्ण करवसुलीच्या काढ़लेला कंत्राट त्वरित रद्द करवा अन्यथा कोर्टात जनहित याचिका दाखल कण्यात येणार आहे.

मदन भरगड
सचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस
माजी महापौर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news