गणेशोत्‍सव 2023 च्‍या अनुषंगाने मनपात 8 सप्‍टेंबर पासून एक खिडकी योजना होणार सुरू.

गणेशोत्‍सव 2023 च्‍या अनुषंगाने मनपात 8 सप्‍टेंबर पासून एक खिडकी योजना होणार सुरू.

अकोला दि. 06 सप्‍टेंबर 2023 – अकोला शहरात गणेशोत्‍सव मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यात येत असतो. तसेच शहरात विविध मंडळांव्‍दारे विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडप टाकून देखावे करण्‍यात येत असतात, त्‍यासाठी विविध विभागाव्‍दारे परवानगी देण्‍या‍करिताच्‍या कामामध्‍ये सुसुत्रता आणण्‍यासाठी आणि गणेश मंडळांच्‍या पदाधिकारी यांना अधिक सोईचे व त्‍यांचा वेळ वाचविण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून शासनाच्‍या  निर्देशानुसार मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरालिकेच्‍या  भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मुख्‍य सभागृह येथे एक खिडकी योजना शुक्रवार दि. 8 सप्‍टेंबर 2023 पासून सुरू करण्‍यात येत आहे. या एक खिडकीव्‍दारे मनपा नगर रचना विभाग, अग्निशमन विभाग, मंडप मध्‍ये  वीज जोडणीसाठी महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनी, शहर वाहतुक विभाग आणि पोलीस प्रशासनाव्‍दारे भेटणारी परवानगी एकाच ठिकाणी उपलब्‍ध करून देण्‍याची सुविधा करण्‍यात येत आहे.

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या पदाधिकारी यांना मनपा प्रशासनाव्‍दारे आवाहन  करण्‍यात येते कि, गणेशोत्‍सव पर्यावरण पुरक साजरा करण्‍यात यावा तसेच स्‍वच्‍छ हवा आणि मतदार नोंदणी संदर्भातील बॅनर दर्शनी भागावर लावून जनजागृती करून सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news