पातुर तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद….

पातुर तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद….

सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको व बंदला सर्व पक्ष आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे झालेल्या लाठी हल्ला व गोळीबार प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी पातुर तालुका बंदचे आव्हान सकल मराठा समाज तसेच सर्व पक्षीय यांनी केले होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संविधानिक व शांततेच्या मार्गाने अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे उपोषण करण्याऱ्या आंदोलकावर पोलिसांकडून झालेला अमानुषपणे लाठी हल्ला व गोळीबारामध्ये शेकडो आंदोलन करते बांधव महिला तथा लहान मुले गंभीरपणे जखमी झालेले आहेत ही घटना राज्यसह देशाला काळीमा फासणारी असल्याने सकल मराठा समाज तालुका पातुर यांच्यावतीने तालुका बंदचे आव्हान केले होते या बंदला सकल मराठा समाजाच्या सह वंचित बहुजन आघाडी, शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस ,मनसे ,भाजपाचे बालूभाऊ बगाडे सह सर्व पक्षांनी पाठिंबा देत बंद मध्ये सहभागी झाले यावेळी सकल सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक कृष्णा भाऊ अंधारे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ,शिवसेना ठाकरे गट निरंजन बंड सकल मराठा समाज तालुका समन्वयक रामभाऊ अमानकर कृष्णा भाऊ अंधारे यांनी आपले विचार, भावना व्यक्त केल्या व समाजाच्या भावना समजून घेऊन सरकारने आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सोडवण्याचे आव्हान केले यावेळी सर्व सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news