सहकार नगरात संतश्रेष्ठ वासुदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

सहकार नगरात संतश्रेष्ठ वासुदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

संत भास्कर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा समवेत सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह
अकोला- गोरक्षण रोड रस्त्यावरील सहकार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात भव्य संतश्रेष्ठ वासुदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा तथा संत भास्कर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व सात दिवसीय  श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम अर्थात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात  विविध कीर्तनकारांची उपस्थिती लाभून परिसर भक्तीमय होणार असल्याची माहिती शनिवारी गजानन महाराज मंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. संत गजानन महाराज मंदिर ट्रस्ट सहकार नगरच्या वतीने दिनांक १३ सप्टेंबर ते 20 सप्टेंबर पर्यंत आयोजित या सोहळ्यात विविध उपक्रम साकार करण्यात आले आहेत. बुधवार दिनांक 13 सप्टेंबर पासून या उत्सवात प्रारंभ होणार असून सकाळी भागवताचार्य हभप राजेंद्र महाराज वक्ते पाळोदी हे श्रीमद् भागवत कथा सादर करणार आहेत.  सात दिवशीय सोहळ्याची जोमाने तयारी श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने सुरू असून पंचक्रोशीतील समस्त महिला -पुरुष भाविक भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा व कीर्तन महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट गोरक्षण रोडचे अध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे,पंकज जायले,डॉ सखाराम पागृत,बळवंतराव आवारे,निरंजन पुरी, दिवाकर टाले, मिलिंद देशमुख ,डॉ ज्ञानसागर भोकरे ,चेतन ढोरे, निलेश निकम,रवी वैराळे, महेश बाठे, विलास देशमुख, स्वप्निल भदे,मनीष हुडेकर, नंदकिशोर चतरकर, राजेश शिंदे, रामाभाऊ यवतकार सुनील नारे महाराज समवेत समस्त विश्वस्त मंडळ व्यवस्थापन, समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news