“जगाचे बौद्धिक नेतृत्व आज भारत करतोय याचं खरं श्रेय गुरूजनांनाच” डॉ. रणजीत पाटिल

“जगाचे बौद्धिक नेतृत्व आज भारत करतोय याचं खरं श्रेय गुरूजनांनाच” डॉ. रणजीत पाटिल

आज जगातील प्रमुख नामांकित संस्था व कंपन्यांमधील भारतीयांचा वाटा अतिशय मोलाचा आहे एकुणच जगाचे बौद्धिक नेतृत्व आज भारत करतोय आणि हे शक्य झाले आहे आपल्या गुरूजनांनमुळे , आपल्या देशाला महान अशी गुरूशिष्य परंपरा लाभली आहे ती जपण्याचे फुलवण्याचे कार्य आमचे गुरूजन करत आहेत असे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित “कृतिशील शिक्षक पुरस्कार” सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते यावेळी त्यांनी शिक्षकांचे मी पालकत्व स्विकारले असून मी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे कोणाच्याही दबावाला बळी न पडता विचलित न होता आपले कार्य विनासायास सुरू ठेवावे, असेही प्रतिपादन केले.
या सोहळ्यात अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या जिल्ह्यातील निवडक (केजी टू पिजी ) शिक्षकांचा यामधे कॉन्व्हेंट स्कूल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय तसेच आश्रम शाळांमधील एकुण ४५ शिक्षकांचा कृतिशिल शिक्षक पुरस्कार देउन गौरव करण्यात आला
🔴 यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर असलेल्या जिल्ह्यातील काही निवडक शाळांचा “कृतिशील शाळा” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
तसेच अध्यापनाच्या कार्यासोबतच उल्लेखनिय शैक्षणिक, सामाजिक कार्य करणार्‍या निवडक शिक्षकांना “शिक्षक रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
🔵सदर कार्यक्रम आज रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी डॉ. रणजीत पाटील यांचे संपर्क कार्यालय सभागृहात पार पडला
🔵 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.नारायणराव गव्हाणकर माजी आमदार बाळापूर विधानसभा मतदारसंघ हे उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी मा. डॉ. अपर्णाताई पाटील, मा. डॉ. नरेशजी बजाज,मा. डॉ. अशोक ओळंबे, मा. संजय चौधरी,मा. रतनसिंग पवार उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अकोला, प्रकाश चतरकर , रविकुमार खेतकर, साबीर कमाल , पुंडलिक भदे, राजेश खुमकर यांचेसह जिल्ह्यातील प्राथ, माध्य, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
🌹कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे यांनी तर आभार कार्यवाह विजय वाकोडे यांनी मानले
🔵कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन राहूल अडगांवकर यांनी केले
🌹कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, दत्तात्रय सोनोने, रूजिता खेतकर, संतोष वाघमारे, देवेंद्र वाकचवरे, चंद्रशेखर पेठे, गजानन शेवलकर, सुनिल माणिकराव, रामभाऊ मालोकार, अरूण वाघमारे, मुरलीधर कुलट, विश्वास पोहरे, रामदास भोपत, संतोषराव इंगळे, नितीन बंडावार, राजेश मसने, धर्मैंद्रसिंह चव्हाण, गजानन गोतरकर, श्याम कुलट, ग.सु.ठाकरे, समाधान उमप , रामदास वाघ, विजय धनाडे, सुरेश परमाळे, एहसान पठाण, दिनेश भटकर, संतोष रा. इंगळे, रूपेश सुर्यवंशी, अश्विन हिंगणकर, अनिल भाकरे, सुभाष जोगदंड, प्रशांत पुराणीक, रविंद्र आवारे, रविंद्र जाधव, बिपिन कुरई,अंजली मानकर, सुनिता कोथळकर, सुरेखा जोशी , जयश्री म्हैसने, सरिता सोळंके, ज्ञानेश्वरी दाळू , कुमुद अंबाळकर, रघुनाथ चव्हाण ,मनोज राठोड, अनंत मिसाळ, दिगंबर खडसे , सतिष खंडारे, मंगेश पेशकर, संदिप मानकर, विनोद शिवरकर, प्रशांत देशमुख, गणेश ठाकरे, अतुल गावंडे, निलिमा दांदळे, शिवशंकर अस्वार ,अमोल सराफ, विष्णू झामरे,अश्विन हिंगणकर, अमोल कावरे, अमित सुरपाटने , अरूण भराडी , निलेश शेगोकार, मोहसीन खान, निलेश धांडे , संदिप महल्ले, राजेश ढोरे, प्रकाश साबळे, हर्षल दोड, पंकज कांबळे, मनोज ताकोदे, महेंद्रसिंह चव्हाण इत्यादींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news