जो भावाचं, देवाचं आणि गावाचं खातो त्याला जीवनात कधी समाधान मिळू शकत नाही – ह.भ. प. श्री गणेश महाराज शेटे

जो भावाचं, देवाचं आणि गावाचं खातो त्याला जीवनात कधी समाधान मिळू शकत नाही – ह.भ. प. श्री गणेश महाराज शेटे

दुसरे वाक पुष्प

अकोट प्रतिनिधी

समर्थ सद्गुरू गजानन महाराज समाधी सोहळा निमित्त योग योगेश्वर संस्थान वरुर जऊळका येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये श्रीमद् भागवत कथेतील दुसऱ्या दिवसाचे वाकपुष्प गुंफतांना महाराजांनी सांगितले मनुष्य जीवन हे निकोप असले पाहिजे आपण जे काही कर्म करतो ते आपल्याला इथेच भरून द्याव लागणार आहे म्हणून कर्म करताना विचारपूर्वक कर्म करावे.
सध्या परिस्थितीत माणूस स्वतःच्या स्वार्थापोटी कुठल्या स्तराला जाईल याची आपण कल्पनाही करू शकत नाही बरीच मानस आपल्या संसारिक जीवनामध्ये सर्व गोष्टीची उपलब्धता असावी, सर्व सुविधा आपल्या घरामध्ये उपलब्ध असाव्या याकरिता आपली पातळी सोडून काम करायला मागे पुढे पाहत नाही. काही लोक असे पाहायला मिळतात देवाची शेती त्यांच्याजवळ पण त्या शेतीच्या पैशातून त्याला मंदिरात दिवा लावायला सुद्धा वेळ नाही मंदिराची देखभाल तर विषय दूरच राहिला, काही लोक असे पाहायला मिळतात स्वतःच्या भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून आहेत आणि काही गावकऱ्यांच्या सहकाऱ्यांनी गावाच्या उच्चपदी बसलेले आहेत पण गावचा विकास न करता त्यामधून कसा पैसा खाता येईल हाच रात्रंदिवस विचार आहे.पण जो देवाच, भावाच आणि गावाच खातो त्याला आंतरिक समाधान कधी लाभत नाही असे विचार ह. भ. प.श्री गणेश महाराज शेटे यांनी भागवत कथेचे दुसरे वाकपुष्प गुंफताना प्रगट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news