अहो आचार्य नाल्या शेजारी नाला अकोला महानगरपालिकेचा उपक्रम!

अहो आचार्य नाल्या शेजारी नाला अकोला महानगरपालिकेचा उपक्रम!

अकोला मनपा नव्हे भाजप मनपा
जगात नाही असे अकोला मनपाचे कौशल्य

अकोला :- महानगरपालिका आणि यातील अभियंते यांच्या नावाने अकोट फैल निवासी कंटाळले असल्याचे चित्र दिसून येत आहे.जगाच्या पाठीवर नाही अस काम महानगरपालिकेचे अभियंता करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोट फैल भागातील आपातापा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत्या येत असल्यामुळे सा.बा.विभागाने रोडचे काम केले ते करत असतांना रोड च्या दोन्ही बाजूला नाल्या बांधायला पाहिजे असा नियम आहे परंतु महानगरपालिकेतील बांधकाम विभागाने लोकवस्तीच्या हिशोबाने मोठ्या ऐवजी लहान नाला बांधून दिला त्यात उजवी बाजुला सुध्दा आधी मनपाचा नाला होता त्याच अर्धवट नाल्यावरसा. सा. बां. विभागाने बांधकाम करुन लाखोचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप तेथील माजी नगर सेवक तसेच नागरिकांनी केला आहे.भाजपच्या काही नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप यानिमित्ताने होत आहे.शासनाकडून दलितवस्ती निधी आला असुन त्या निधीची कशाप्रकारे विल्हेवाट लावल्या जात आहे.

हे वेगळे सांगायची गरज नाही. सा.बा.विभागाने नाला बांधल्यावर मनपा आयुक्त कविता व्दिवेदी यांनी दलित वस्ती चा निधी पुन्हा त्याच नाल्या शेजारी नाला वळविल्याने येथील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे. अबब दोन नाले शेजारी शेजारी?एकाच जागी दोन नाल्यांचे बांधकाम करणारी एकमेव महानगरपालिका म्हणजे ती अकोला महानगरपालिका असे म्हणायला हरकत नाही. संध्या च अभियंता दिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे. आणी शुभेच्छा सहीत पारितोषिक दिल्या जात असेल तर मनपा अभियंत्याला नाल्या शेजारी नाला बांधल्यामुळे यांना विशेष बक्षीस दिले पाहिजे अशी चर्चा सामान्य नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेचे अभियंते पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे? शहरातील आम नागरिकांच्या लक्षात येते मग अभियंताच्या का नाही?असे येथील नागरिक बोलत आहेत. जनतेच्या पैशाचा दुरुपयोग कश्याप्रकारे होत आहे हे यावरुन दिसुन येत. येथील माजी नगर सेवक सौ.चांदणी शिंदे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम व महानगरपालिका अभियंता यांना अवगत केल्यावरही कुठल्याच प्रकारची चौकशी न करता सत्तंर लाख या नाल्याच्या बांधकामात घालवल्यामुळे जनतेच्या पैशाची वाट लावत असल्याचे दिसत आहे.या नाल्यात भ्रष्टाचार झाल्याने यासंदर्भात माहिती अधिकार मागण्याची पाळी यामुळे आली आहे. या कारणाने अकोला महानगरपालिका न म्हणता भाजप महानगरपालिका म्हणायला हरकत नाही.भाजप चा नारा” न खाऊंगा न खाने दुंगा,”अच्छे दिन.फक्त म्हणायला छान वाटतात परंतु अकोल्याच्या अशा अफलातुन विकासासाठी पैश्याची नासाडी होत असेल तर जनता येणार्या निवडणुकीत याचे पडसाद नक्की च उमटतील अशी चर्चा शहरात सुरु आहे. आयुक्त कामाचे देयक वितरीत करण्यापुर्वी स्पॉट इन्फेकशन करतात आधी त्यांनी या नाल्याची पाहणी करावी नंतरच याचे देयक काढायचे की नाही हे ठरवून जनतेच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी अशी मागणी अकोट फैल परिसरातील सामान्य नागरिकांची मागणी आहे.यावर आयुक्त काय करतात ते येणार्या वेळेत कळेल.तोपर्यंत शहराचा विकास होतो की भकास याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news