आउटसोर्सीग च्या माध्यमातुन दरमहा 11 लाखाची लूट?

अकोला मनपात चाललंय तरी काय? आउटसोर्सीग च्या माध्यमातुन दरमहा 11 लाखाची लूट?
आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी?

अकोला:- महानगरपालिका म्हणजे राजकीय भ्रष्टाचाराचे उगमस्थान झाले असल्याचे चित्र जवळपास दिसत आहे. घोटाळ्यांची मालीका सुरुच आहे थांबण्याचे नावच घेत नाही. आतापर्यंत झालेले घोटाळे विषेश म्हणजे एकावरही कार्यवाही नाही. अंधेर नगरी चौपट राजा जंपींग घोटाळा,पोकलड घोटाळा,सायकल घोटाळा,शौचालय घोटाळा,अग्रिमधन घोटाळा,जिपीएफ घोटाळा,हळदी कुंकु घोटाळा असे अनेक घोटाळ्यांनी महाराष्ट्रात प्रथम स्थान असलेली एकमेव अकोला महानगरपालीका प्रसिध्द आहे.येथे घोटाळे करणाऱ्यांना रान मोकळे आहे. चोर चोर मौसेरे भाई ज्या मनपात आक्रुतीबंधानुसार 341 कर्मचारी शिल्लक आहेत त्यांनाच स्थान नाही. त्यांना व्यपगत कर्मचारी म्हणून पदनाम दिले आहे. त्यांना विभाग सुध्दा नाही. इतक्या मोठ्याप्रमाणात कर्मचारी शिल्लक आहेत मग तेथे अतिरिक्त आउट सोर्सीग चे कर्मचारी लावण्याचे काय काम? हे आम नागरिकांच्या लक्षात येत आहे परंतु आयुक्तांच्या लक्षात न येणे म्हणजे नवलच? अकोला शहरातील नागरिकांच्या घामाच्या पैशाची खुलेआम लूट सुरु असल्याचे दिसत आहे. याचे पडसाद येणा-र्या निवडणूकीत उमटतील यात शंका नाही.

आता पून्हा नविन घोटाळा समोर आला आहे.आउटसोर्सिंग च्या कर्मच्या-र्याकडून प्रत्येक माह 3700 रुपये वसुल करण्यात येतात याकामी पाटील नामक कंत्राटदार भुमिका अदा करत असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता प्रत्येक महिन्याला हा पाटील दलाल 11 लक्ष रुपये गोळा करतो आणि रक्त लागलेल्या या रक्तपिशाच नेत्यांना हिस्सा जमा करतो या मध्ये 4 नगरसेवक असल्याने कोणी तक्रार द्यायला समोर येत नसल्याने यांची चांदी होत आहे. ते महाभाग कोण ?चौकशी झाल्यास भ्रष्टाचारी समोर येतील. कंत्राट कोणाचे नाव कोणाचे यांची चौकशी झाल्यास मोठमोठे नाव समोर येण्याची शक्यता नकारता नाही येत. या पाटील दलालाची स्वताची कंत्राट पध्दत सुरु असल्याची खबर मनपात वा-र्यासारखी पसरली आहे परंतु राजकीय हस्तक्षेप मुळे कोणी समोर यायला तयार नाही.

आउटसोर्सिंग च्या माध्यमातून मनपात जवळपास 300 कर्मचारी काम करत आहेत ज्यामध्ये अभियंता,ऑपरेटर, व्हाल ओपनर,फायरमन आणी वाहन चालकांचा समावेश आहे. मनपाचा आस्थापना खर्च कमी करण्याची जवाबदारी आयुक्तांची असुन त्यांचे यावरून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसत आहे. अधिकारी मस्त आयुक्त सुस्त? आधी महानगरपालिकेची नाहक बदनामी झाल्याचे कारण देऊन कार्यवाही चा देखावा करणा-र्यावर आयुक्तांना हे दिसत नाही म्हणजे नवलच आधीसारखी कठोर कार्यवाही करत नसल्यामुळे या अधिका-र्याचे मनोबल दिवसेदिवस वाढत आहे. आयुक्तांनी आउटसोर्सीग,मानसेवी, हदवाड कर्मच्या-र्यांच्या पगारात या महिन्यात 5 हजार रुपयांची वाढ केली खरी मात्र कर्मचारी नाराज असल्याने काही उपयोग झाला नसल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखवले आम्ही मेहनत करतो घाम गाळतो आणी हे लोक आमच्या घामाचे पैसे गुंडा प्रमाणे दर महिन्याला हिसकावून घेतात त्या पैशात आमच्या मुलाबाळाचे दुध,घराचे भाडे,शाळेची फी,तसेच इतर खर्च होण्यास मदत मिळू शकते पण महिण्याला 3700 रुपये हप्ता घेतल्याने हिरमोड झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

या महिन्यात पहिला पगार हातात आला पुढे यांची मागणी वाढते काय या धाकाने चिंतेचे वातावरण पहावयास मिळाले आहे.आयुक्तांना हि गोष्ट माहित आहे की नाही परंतु आपल्या दैनिक मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यास आयुक्त तथा प्रशासक निश्चित या प्रकरणात लक्ष देतील आणी आमच्यावर होत असलेला अन्याय दुर करतील अशी अपेक्षा सत्य लढाशी बोलतांना व्यक्त केली. यावरुन मनपात किती भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो हे लक्षात येते.यानिमित्ताने आउटसोर्सीग कर्मचारी आणी अकोला शहरातील जनतेच्या माध्यमातुन काही प्रश्न उपस्थीत करत आहे. यावर आयुक्तांनी लक्ष देण्याची विशेष विनंती करण्यात येत आहे. या गंभीर प्रकरणात आयुक्त पोलीस तक्रार देतील का?याप्रकरणाची विभागिय चौकशी बसवणार का?शहरातील नागरिकांच्या सर्रास होणाऱ्या पैशाची उधळपट्टी थांबवतील का? ते राजकिय पदाधिकारी, नेते कोण? जनतेसमोर आणतील का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहे. यावर आयुक्त तथा प्रशासक यांनी तत्काळ लक्ष घालून योग्य कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news