महानगरपालिकेच्या कृपेने सणासुदीच्या काळात जुने शहरअंधारात!

       अकोला:- जुने शहर डाबकी रोडवरील सणासुदीच्या काळात पथदिवे बंद असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर पथदिवे दिवसा सुरु आणी रात्री बंद असतात याकडे वारंवार तक्रार करुनही उपयोग होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.पथदिवे टाईमशीर सुरु आणी बंद करण्याची जवाबदारी महानगरपालिका विद्युत विभागाची आहे. येथे कंत्राटी पध्दतीने अभियंत्याची नियुक्ती केल्यावरही शहर अंधारात राहत असेल तर हे अभियंते करतात तरी काय !असा प्रश्न उपस्थित होत आहे.ई एस एल कंपणीकडे याचा कंत्राट दिला होता त्यामध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची बातमी सत्य लढाने याआधीही प्रसिद्ध केली होती.तरीपण आयुक्तांनी कार्यवाही का करत नाही्त !

       आता आता शंका उपस्थित होत आहे. महानगरपालीकेने कुली यापदावर असलेला इलेक्ट्रानिक चे सर्टिफिकेट वर इलेक्ट्रिक अभियंता पदावर पदोन्नती दिल्याने हा गोंधळ होत असल्याचे यावरुन दिसते म्हणायला हरकत नाही.नियमानुसार सायंकाळी सहा वाजता पथदिवे सुरु करुन पहाटे सहा वाजता बंद व्हायला पाहिजे याकरीता प्रभागानुसार कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचे पण दुर्लक्ष होतांना दिसत आहे. लाईट बंद असल्यावर त्याचा रिपोर्ट अभियंता कडे जातो 24 तासात नवीन लाईट न लावल्यास दंडाची तरतूद वर्क आडर मध्ये आहे. परंतु आजपर्यंत विद्युत विभागाने किती दंड आकारला आणि तो किती वसूल केला याची माहिती सादर करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून नागरिकांकडून होत आहे. अभियंत्यांनी केलेल्या कामाची चौकशी झाल्यास भ्रष्टाचार समोर येवू शकतो.यासर्व विषयावर आयुक्त प्रकाश टाकतील का की तोही की डाबकी रोड सारखा रोड सारखा अंधारात ठेवतील का अशी मागणी शहरातील नागरिक चर्चा करीत आहे.

विशेष म्हणजे या अगोदर

   सत्य लढा च्या बातमीचा धसका घेत ई एस एल कंपणीने आपली दुकानदारी बंद करून गाशा गुंडाळल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शहरात दिवसा पथदिवे सुरू रात्री बंद!

       शहरात दिवसा दिवे सुरु राहत असल्यामुळें विजबिल वाढत राहते आम नागरिकांच्या घामाच्या पैशाची महानगरपालिका आयुक्त नियोजन करत नसल्यामुळे याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सनासुदिचे दिवस असुन पुढील आठवड्यात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. कमीतकमी नवरात्र ते दिवाळी पर्यंत तरी दिवे व्यवस्थित राहतील याची व्यवस्था आजपासुन केल्यास नागरिकांना अंधारात रहावे लागणार नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news