बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाची अकोला जिल्हा कार्यकारिणी गठित

बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाची अकोला जिल्हा कार्यकारिणी गठित


बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाची अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय सदस्य यांची सभा गुरुवार दिनांक 12 आक्टोबर 2023 ला स्थानिक अशोक वाटिका येथील सभाग्रुहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे ( चंद्रपूर ) हे होते. आपले विचार मांडतांना राजकुमार जवादे यांनी सरकारी उद्योगाचे खाजगीकरण होत असल्यामुळे नवीन कर्मचारी भरती प्रक्रिया बंद झाली असून त्यामुळे आरक्षणही बंद होण्याच्या मार्गावर आहे , बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे असे नमूद केले. सभेमध्ये राष्ट्रीय महासचिव पि.एच.गवई ( बुलढाणा), महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा.शेषराव रोकडे,(नागपुर) राज्याचे संघटन सचिव सिध्दार्थ डोईफोडे,(पुलगाव ) राज्याचे सचिव सिध्दार्थ सुमन,(भद्रावती) राज्याचे कोषाध्यक्ष प्रा.अशोक ठवळे,( वरुड ) राज्याचे सचिव क्र. 2 नरेश मुर्ति अकोला इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेमध्ये अकोला जिल्हा बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडियाची कार्यकारिणी गठित करण्यात आली ‌.अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून प्रकाश बोदडे, जिल्हा सचिव म्हणून प्रा.श्रीक्रृष्ण घ्यारे,सह-सचिव सुनिल इंगळे, संघटन सचिव – अविनाश वासनिक, कोषाध्यक्ष – कैलास भाऊ जोंधळे, विधी सल्लागार एडवोकेट चंद्रशिल दंदि व एडवोकेट बि.आर वाकोडे, प्रसिद्धी प्रमुख-पत्रकार डि.जे वानखडे, कार्यकारिणी सदस्य – अशोक बन्सोड,साहेबराव कांबळे, रामकृष्ण बोरकर,रोहित डोंगरे, नाना घरडे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे संचालन डि.जे वानखडे तर आभार प्रदर्शन नरेश मुर्ति यांनी केले यासभेला अकोला जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वानी नवनियुक्त कार्यकारणी चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news