दुर्गा विसर्जन व धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणूकीनिमित्त वाहतुकीत बदल

दुर्गा विसर्जन व धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणूकीनिमित्त वाहतुकीत बदल

अकोला, दि. 18 :  शहर व ग्रामीण परिसरातील दुर्गा विसर्जन गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावर व बाळापूर येथील भिकुंड नदीच्या पुलावर दि. 25 ऑक्टोबरला होईल. याचदिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक व अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानात सभाही होणार आहे. यादिवशी सकाळी 6 वा. पासून ते दि. 26 ऑक्टोबरच्या सकाळी 6 वा. पर्यंत शहरात, तसेच अकोट- अकोला राज्यमार्ग व पारस फाटा- बाळापूर मार्गावर सुव्यवस्थित रहदारीसाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला.

अकोला शहरातील पर्यायी मार्ग

डाबकी रस्ता, जुने शहर, विठ्ठल मंदिराकडून बसस्थानकाकडे, तसेच मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक डाबकी रोड, जुने शहर, भांडपुरा चौक, पोळा चौक, किल्ला चौक, हरिहर पेठ, वाशिम बायपास चौक, राष्ट्रीय महामार्ग क्र.6 ने लक्झरी बसस्थानक, निमवाडीसमोरील उड्डाण पूल, हुतात्मा चौक, नेहरू पार्क, सिव्हिल लाईन चौक, पोस्ट ऑफिस चौक ते अकोला बसस्थानक अशी वळविण्यात येईल.

          बसस्थानक चौक, कोतवाली चौक, डाबकी रस्ता, तसेच पोळा चौक, हरिहरपेठेकडे जाणारी वाहतूक अकोला बसस्थानक, पोस्ट ऑफिस चौक, सिव्हिल लाईन चौक, नेहरू पार्क चौक, हुतात्मा चौक, ओव्हर ब्रिज, निमवाडी पोलीस वसाहतसमोरून, लक्झरी बस स्थानक, वाशिम बायपास चौक, हरिहर पेठ, किल्ला चौक, भांडपुरा चौक, डाबकी रोड, जुने शहर अशी वळविण्यात येईल.

रेल्वे उड्डाण पूल ते अकोट स्टँड, टिळक रोड, कोतवाली, लक्झरी बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक रेल्वे ओव्हर ब्रिज, रेल्वे स्टेशन चौक, अग्रसेन चौक, उड्डाण पुलावरून जेल चौक, लक्झरी बसस्थानक यामार्गे वळविण्यात येईल.

लक्झरी बसस्थानक चौकाकडून कोतवालीमार्गे अकोट स्टँडकडे जाणारी वाहतूक लक्झरी बसस्थानक चौक, जेल चौक, उड्डाण  पुलावरून, अग्रसेन चौक, अकोट स्टॅण्डकडे वळविण्यात येईल.

अकोला– अकोट राज्य मार्गावरील वाहतूक

          अकोला ते अकोटकडे जाणारी वाहतूक व अकोटहून अकोल्याकडे येणारी वाहतूक बसस्थानक, पोस्ट ऑफिस चौक, सिव्हिल लाईन चौक, नेहरू पार्क चौक, हुतात्मा चौक, उड्डाण पुलावरून, लक्झरी स्टॅण्ड चौक, वाशिम बायपास चौक, शेगाव टी पॉईंट, गायगाव, निंबा फाटा, देवरी मार्गे अकोट या मार्गाने वळविण्यात येईल.

          अकोला बसस्थानकावरून म्हैसांगमार्गे दर्यापूरकडे व दर्यापूरहून अकोल्याकडे येणारी वाहतूक अकोला बसस्थानक, पोस्ट ऑफीस चौक, सिव्हील लाईन चौक, नेहरू पार्क चौक, हुतात्मा चौक, ओव्हर ब्रीज वरून, लक्झरी स्टँड चौक, वाशिम बायपास चौक, शेगाव टी पॉईंट, गायगाव, निंबा फाटा, देवरी अकोट मार्गे दर्यापूर या मार्गाने वळविण्यात येईल.

पारस फाटा– बाळापूर– खामगाव मार्गावरील वाहतूक

अकोला, पारस फाटा, बाळापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक अकोला, पारस फाटा, हायवे ट्रॅफिक कार्यालयाकडून बाळापूरकडे वळविण्यात येईल.

खामगाव- पारस फाटा- बाळापूर- पातूरकडे जाणारी व येणारी वाहतूक खामगाव, पारस फाटा, अकोला (वाशिम बायपास चौक), पातूरकडे जाणारी, तसेच पातूरकडून बाळापूरकडे येणारी वाहतूक याच मार्गाने वळविण्यात येईल.

अकोला- पारस फाटा (उड्डाण पूल) हायवे ट्रॅफिक कार्यालयाकडून खामगावकडे जाणारी वाहतूक अकोला, पारस फाट्याजवळील रोशन धाबा येथून वाहतूक वळवून खामगाव ते अकोला येणाऱ्या मार्गावर तपे हनुमान मंदिराजवळील दुभाजक बॅरेकेटिंग पॉईंटपर्यंत या मार्गे वळविण्यात येईल.

000

वृत्त 763

 ग्रा. पं. निवडणूक क्षेत्रात ३ दिवस मद्यविक्रीला प्रतिबंध

अकोला, दि. १८ : ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानाआधीचा, मतदानाचा व मतमोजणीचा असे 3 कोरडे दिवस जाहीर करण्यात आले असून, यादिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद राहतील. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.

निवडणूक असलेल्या ग्रा. पं. क्षेत्रात मतदानाआधीचा दिवस दि. ४ नोव्हेंबर (संपुर्ण दिवस), मतदानाचा दिवस दि. ५ नोव्हेंबर (संपूर्ण दिवस)      व मतमोजणीचा दिवस    दि. ६ नोव्हेंबर या तीन दिवशी मद्यविक्रीची दुकाने संपूर्ण दिवस बंद राहतील.  मतमोजणी असणाऱ्या तालुका मुख्यालयी, महानगरपालिका व नगरपरिषद, तसेच नगरपंचायत क्षेत्रातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील.

०००

वृत्त 764

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे 

पंतप्रधानांच्या हस्ते आज ऑनलाईन लोकार्पण

अकोला जिल्ह्यात सुरू होणार ९ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे

अकोला, दि. 18 : राज्यातील ५०० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या गुरुवारी (दि. १९ ऑक्टोबर) रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील ९ केंद्रांचा समावेश आहे.

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रातील युवक युवतींच्या कौशल्य विकासासाठी व त्यांच्यातून उद्योजक निर्माण होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतराची गरज पडू नये व स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रथम टप्प्यात ५००  केंद्रांची निर्मीती करण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यात बोरगाव मंजू (अकोला), मुंडगाव (अकोट),  चोहट्टा (अकोट), वाडेगाव  (बाळापूर), माळेगाव बाजार (तेल्हारा), हिवरखेड (तेल्हारा), हातगाव ( मूर्तिजापूर), पिंजर महान (बार्शिटाकळी), आलेगाव (पातूर) या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरू होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी नागरिकांना संबोधित करणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण केंद्रांच्या ठिकाणी होणार आहे. युवक, युवती व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news