आगिखेड येथील अंकुश बंडु अत्तरकार या सावित्रीबाई फुले विद्यालय,पातूर शाळेच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरावर झेप…….

आगिखेड येथील अंकुश बंडु अत्तरकार या सावित्रीबाई फुले विद्यालय,पातूर शाळेच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरावर झेप…….

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अकोला.यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक:-१८/१०/२०२३ श्री.वसंत देसाई स्टेडियम वर पार पडलेल्या विभाग स्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये आगिखेड येथील अंकुश बंडु अत्तरकार या सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंने अतिशय चांगली कामगिरी करून राज्य स्तरावर होणाऱ्या स्पर्धेमध्ये झेप घेतली.
विभागीय स्तरावर झालेल्या शालेय मैदानी स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 19 वर्षे वयोगटातून आगिखेड येथील अंकुश बंडू अत्तरकार याने गोळा फेक मध्ये विजय मिळवून राज्य स्तरावर होणाऱ्या मैदानी स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.अंकुश चे सर्वच स्तरातुन कौतुक केले जाते आहे. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news