मनपात महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अधिनियम 2015 अंतर्गत राज्‍य सेवा हक्‍क आयोग अमरावती खंडपीठाचे आयुक्‍त यांची आढावा बैठक संपन्‍न.

मनपात महाराष्‍ट्र लोकसेवा हक्‍क अधिनियम 2015 अंतर्गत राज्‍य सेवा हक्‍क आयोग अमरावती खंडपीठाचे आयुक्‍त यांची आढावा बैठक संपन्‍न.

अकोला दि. 26 ऑक्‍टोंबर 2023 – आज दि. 26 ऑक्‍टोंबर 2023 रोजी अकोला महानगरपालिकेत महाराष्‍ट्र  लोकसेवा हक्‍क अधिनियम 2015 च्‍या प्रभावी अंमल बजावणीच्‍या अनुषंगाने मा.आयुक्‍त, राज्‍य सेवा हक्‍क आयोग अमरावती डॉ. एन.रामबाबू (मुख्‍य सचिव दर्जा) यांच्‍या व्‍दारे मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या उपस्थितीत त्‍यांचे दालनात आढावा बैठक संपन्‍न झाली.

          यावेळी सर्वप्रथम मनपा आयुक्‍त तथा प्रशासक व्दिवेदी यांच्‍याव्‍दारे डॉ. एन.रामबाबू यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत करण्‍यात आले. तदनंतर अकोला महानगरपालिका अंतर्गत शहरातील नागरिकांना महाराष्‍ट्र   लोकसेवा हक्‍क अधिनियम 2015 अंतर्गत पुरविण्‍यात येणा-या कालमर्यादेतील 52 सेवांबाबत संपुर्ण आढावा घेण्‍यात आला.

          सदर बैठकीमध्‍ये राज्‍य सेवा हक्‍क आयोग, अमरावती विभाग अमरावतीचे कक्ष अधिकारी श्री देवेंद्र चव्‍हाण, नोडल ऑफीसर तथा मनपा उपायुक्‍त गीता वंजारी, मनपा समन्‍वय कक्षाचे अधिकारी विठ्ठल देवकते, प्रथम अपिलीय अधिकारी नगर रचनाकार आशिष वानखडे, पदनिर्देशीत अधिकारी तथा सहा.आयुक्‍त विजय पारतवार, प्रशासन अधिकारी अनिल विडवे, मुख्‍य अग्निशमन अधिकारी हारूण मनियार, जन्‍म मृत्‍यु विभागाचे  प्रमुख हेमंत रोजतकर, परवना विभागाचे राजेश सोनाग्रे, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता शैलेश चोपडे, विवाह नोंदणी कार्यालयाचे एम.एच.गिरी, पंकज देवळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news