रिपब्लीकन सेनेच्या वतीने सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने संविधान बचाव यात्रा 3 नोव्हेंबर ला अकोल्यात!!

रिपब्लीकन सेनेच्या वतीने सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने संविधान बचाव यात्रा 3 नोव्हेंबर ला अकोल्यात!!

दीक्षाभूमी ते चैत्यभूमी सॉविधान बचाव यात्रा संपुर्ण महाराष्र्टातील जिल्ह्यामध्ये झंझावत आहे.

अकोला . लोकशाहीचा जागर! सविधानाचा आदर !! करण्यासाठीं अशोका विजयादशमी दिनी दि .24 ऑक्टोंबर 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातु तथा इंदुमिल आंदोलनाचे प्रनेते,रिपब्लिकन सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब यांनी दीक्षाभूमी येथे सविधान बचाव यात्रा रथाला हिरवां झेंडा दाखवून समाजभूषण काकासाहेब खंबाळकर प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांच्या नेतृत्वाखाली आणि रिपब्लिकन सेना महिला आघाडी, महा.राज्यप्रभारी श्रीमती सारिका सिताराम शिंदे यांच्या उपस्थितीत ही दिक्षभूमी नागपूर ते चैत्यभूमी, दादर, मुंबई अशी संविधान यात्रा प्रारंभ झाली असुन संपुर्ण विदर्भाचा दौरा पुर्ण करीत ही रथयात्रा उद्या दिनांक 3 नोव्हेंबर रोजी अकोल्यात दाखल होत आहे. त्यानिमित्ताने अकोल्यात ह्या सविधान बचाव यात्रा रथ यात्रे च्या स्वागताची तयारी *रिपब्लिकन युवा सेना युवा आघाडीचे राज्य महासचिव देवेश पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण झाली असल्यची माहिती आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली आहे.

अकोल्यात अशी होईल जागृती

स्थानिक अशोक वाटिका येथे दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पासुन संविधान जागृतीपर भीम बुद्ध गीतांच्या गायनाचा कार्यक्रम अखंडितपणे सूरू असेल तर दुसरीकडे स्थानीक विश्रामगृह येथुन संविधान बचाव रथाला सुरवात करुन टॉवर चौक, रेल्वे स्टेशन मार्गे शिवाजी कॉलेज रोड, तिलक मार्ग, सिटी कोतवाली पोलिस स्टेशन जवळून गांधी रोड, बस स्टँड मार्गे अशोक वाटिका येथे पोहचून रॅलीचा समारोप करण्यात येईल.
सविधान रॅलीमधील उपस्थित सर्व आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन आणि समाजामधील तळागळातील लोकांना सैदव तत्पर असणारे *25 सामाजीक कार्यकर्त्यांचा सत्कार* करून हा संविधान बचाव रथ बुलडाणा जिल्ह्यात जाण्यासाठी मार्गस्थ होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील जवळपास ६० राज्यघटनांचा सखोल अभ्यास, चिंतन, मनन करून देशाला संविधान अर्पित केले आहे. भारतीय संविधान हे केवळ लोकशाही, अधिकार, कर्तव्ये अंतर्भूत असलेले पुस्तक नसून तात्विक दृष्ट्या मागासलेल्या वंचित समाजाच्या आणि भारतीयांच्या शेवटच्या घटकातील प्रत्येकाची सर्वागीण काळजी वाहणारा तो एक मूलगामी तत्वग्रंथ आहे ! २५ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेत शेवटच्या भाषणात म्हणतात, माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला इशारा लक्षात घेणे गरजेचे आहे. अशा भारतीय संविधानाद्वारे लोकशाहीची देशामध्ये रुजवणूक होतांना राष्ट्रहित- समाजहित समोर ठेवून स्वातंत्र्य समता बंधुता याचा मोठ्या प्रमाणात प्रचार- प्रसार होत राहणे अत्यंत गरजेचे आहे. परंतू आज सगळीकडे मंदिर-मस्जिद – झेंडे – भोंगे आदी विषय गाजत आहेत, त्याचबरोबर सरकारने वाढती महागाई, बेरोजगारी संबंधाने मुलभूत धोरणांची अमलबजावणी करून खाजगीकरणाला आळा घातला पाहिजे. मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तरूणांची डोकी कामाला लावल्यासआपला देश मोठया दिमाखात स्वातंत्र्याची शंभरी साजरी करेल, परंतु ज्या संविधानाने या देशाला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायाच्या विचार सूत्रात गुंफून देशाला समृद्धतेच्या उंच शिखरावर नेले आहे तेच सविधान आज बदलण्याची भाषा केली जात आहे. हा धोका ओळखून समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी, संविधानवादी, विवेकवादी विचारसरणीच्या सर्वानी एकत्र येऊन संविधानिक समतामुलक समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी
जागरूकतेने एक संघ होऊन लढ़ा उभारणे गरजेचे आहे. या सर्वाच्या अनुषंगाने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, समाजामध्ये संविधानिक मूल्य रुजवावीत आणि संविधानिक अस्मिता प्रत्येक नागरिकात निर्माण होऊन संविधानिक संस्कृती निर्माण होऊन समाजामध्ये संविधान साक्षरता आणि संविधानिक जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू , इंदुमिल आंदोलनाचे प्रणेते, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व समाजभूषण काकासाहेब खंबाळकर (प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र ) यांच्या नेवृत्वाखाली दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ पासून लोकशाही मागनि दिक्षाभूमी नागपूर येथून संविधान बचाव यात्रेस सुरुवात झाली आहे. ही संविधान बचाव यात्रा, दीक्षाभूमी नागपूर येथून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्मात जात आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे फिरून या यात्रेचा समारोप दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी चैत्यभूमी दादर मुंबई येथे होणार आहे. या देशातील वंचित -उपेक्षित, बहजन घटकाच्या अस्तित्वासारठी देशाच्या सार्वभौमत्वासाठी, भारतीय संविधान जिवंत राहणे गरजेचे आहे. म्हणून संविधान वाचवा! देश वाचवा!, ही आर्त हाक ऐकून सर्वानी या संविधान बचाव यात्रेत अकोला जिल्ह्यातील सर्व सविधान प्रेमी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान रिपब्लिकन सेनेच्या वतीने रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेश महासचिव देवेशदादा पातोडे यांनी केले आहे.
दिनांक 3 नोव्हेंबर रोजी अकोल्यात जागृति करणाऱ्या
सविधान बचाव यात्रा मध्ये समाजभूषण काकासाहेब खंबाळकर (अध्यक्ष महाराष्टू प्रदेश), विजयराव वाकोडे (राज्य उपाध्यक्ष) प्रा. युवराज धसवाडीकर (सरचिटणीस), समाजभूषण वंसत कांबळे (राज्य प्रवक्ते), प्रा.डॉ. विजयकुमार लामकानेकर (राज्य प्रवक्ते), भैय्यासाहेब भालेराव (राज्य संघटक) भगवान दादा शेंडे (राज्य उपाध्यक्ष),विनायकराव द्धधे (राज्य उपाध्यक्ष), खांजामिया पटेल (राज्य उपाध्यक्ष) संजय देखणे (राज्य उपाध्यक्ष), श्रीपती ढोले (राज्य सचिव ), माधवराव जमधडे, (राज्य सचिव), सचिन अलगट (राज्य सचिव) युवराज बनसोडे (रिपब्लिकन कामगार सेना) किरण घोंगडे अध्यक्ष युवा रिपब्लिकन सेना महाराष्ट् राज्य, विवेक बनसोडे (रिपब्लिकन विद्यार्थी सेना), रमेश जाधव (कामगार नेते मुंबई), देवेश पातोडे (युवा राज्य महासचिव) मिलींद बनसोडे (अध्यक्ष मराठवाडा), लिंबाजी वाहुळकर (मराठवाड उपाध्यक्ष), चंद्रकांत रूपेकर (मराठवाडा सचिव) योगेंद्र चौरे (अध्यक्ष विदर्भ विभाग), चंद्रकांत खंडायत
(पश्चिम महाराष्र , डॉ. भुषण भरमे (विदर्भ संघटक) ंऍड .एम जी सोनकांबळे (मराठवाडा महासचिव) योगेंन्द्र चवरे माजी विदर्भ अध्यक्ष अॅड.गजानन तेलगोटे माजी विदर्भ उपाध्यक्ष जयकुमार चौरपागर माजी जिल्हाअध्यक्ष संजय डोंगरे जिल्हा संघटक अशोक इंगोले जिल्हा कोषाध्यक्ष .दिलीप दंदी जिल्हाउपाध्यक्ष आदींचा समावेश या सविधान बचाव यात्रा मध्ये असणार आहे. अशी माहिती आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news