ग्रा. पं. निवडणूक क्षेत्रात कलम १४४ अन्वये आदेश जारी

ग्रा. पं. निवडणूक क्षेत्रात कलम १४४ अन्वये आदेश जारी
अकोला, दि. १ : जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ३८
ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत असलेल्या क्षेत्रात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडून फौजदारी प्रकिया संहितेच्या कलम १४४ अन्वये आदेश निर्गमित करण्यात आला.
निवडणूकीसाठी दि. ५ नोव्हेंबरला मतदान व दि. ६ नोव्हेंबरला तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणी संपेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
आदेशानुसार, मतदान केंद्र परिसरात पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी जमू नये. मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी अनधिकृत व्यक्तीस परिसरात १०० मीटर परिसरात प्रवेश करता येणार नाही.
त्याचप्रमाणे, मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसरात मंडप, दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस, ध्वनिक्षेपक, फेरीवाले, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूक
कामाव्यतिरिक्त खासगी वाहन आदींना प्रतिबंध घालण्यात आला आहे.
निवडणूक साहित्य कक्ष (स्ट्रॉंग रूम), मतदान व मतमोजणी केंद्र येथे निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत कलम १४४ अन्वये आदेश लागू राहतील.
पोलीस अधिक्षक यांच्याकडून कलम ३६ नुसार आदेश जारी
ग्रामपंचायत निवडणूक व पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जारी केला.
आदेशानुसार, मिरवणूक नियंत्रण, त्यांचे मार्ग निश्चित करणे,  उपासनास्थळी अडथळा होऊ न देणे, सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे, ध्वनिक्षेपक वापर नियंत्रण आदींसाठी पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्यापेक्षा वरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news