“आता वाढवून दिलेली मुदत अखेरची” मनोज जरांगेंचं उपोषण मागे

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवली सराटीत आलं होतं. यात माजी न्यायाधीशांसह मंत्र्यांचाही समावेश होता. यावेळी मराठ्यांना आरक्षण देण्याच्या कायदेशीर बाजूंवर चर्चा करण्यात आली. कोणताही निर्णय घाईगडबडीत घ्यायचा नाही. टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यामुळे थोडा वेळ देण्याची विनंती या शिष्टमंडळाने केली.

अनेक वर्ष थांबलो आणखी काही दिवस देऊ असं  सांगत समितीला वेळ वाढवून देऊ असं जरांगे यांनी म्हटलं आहे. तसंच याच समितीने वेळ घेऊन राज्यभर काम करावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. पण आता दिलेली मुदत अखेरची असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. 

सर्व मराठ्यांची दिवाळी गोड व्हावी करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. समितीला दीड ते दोन महिन्यांचा वेळ हवा आहे. मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ हवा आहे त्यामुळे त्यांना वाढवून देऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची वेळ वाढवून दिली आहे. यापुढे एकही दिवस वाढवून देणार नाही असंही जरांगे पाटील यांनी ठणकावलं आहे. तर धनंजय मुंडे यांनी 2 जानेवारीपर्यंतची मुदत मागितली. जरांगे पाटील यानी आणखी वेळ वाढवून देण्यास नकार दिला. पण मंत्र्यांच्या विनंतनतर जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळत असेल तर 2 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात तयारी दर्शवली. 

निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड आणि सुनील शुक्रे यांनी आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर बाजू समजावून सांगितल्या. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठीचे निकष पार पाडले जात आहेत. त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. थोडा वेळ द्या. एक दोन दिवसात प्रश्न सुटत नाही. आपण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहोत. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ द्या, असं या दोन्ही निवृत्त न्यायाधीशांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news