ज्वारी, बाजरी व मका हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरू

ज्वारी, बाजरी व मका हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरू

अकोला, दि. 7 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमी भावाने खरेदीसाठी ज्वारी, बाजरी व मका पीकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर येथील खरेदी केंद्रावर दि. 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. संकरित ज्वारी 3 हजार 180 रू., मालदांडी ज्वारीसाठी 3 हजार 225 रू. मक्यासाठी 2090 रू. बाजरीसाठी 2 हजार 500 रू. हमीभाव आहे.

शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी एनईएमएल पोर्टलवर करण्यासाठी शेतक-यांचा पीकाची नोंद असलेला सातबारा,आधारलिंक असलेला बँकेचा खाते क्रमांक, आधारकार्डाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक, तसेच ऑनलाईन नोंदणी करतेवेळी शेतक-यांचा स्वत:चा फोटो घेणे बंधनकारक आहे. पेमेंट प्रणाली पीएफएमएस असून, आधारलिंक असलेले बँक खाते असावे, संयुक्त बँक खाते घेता येणार नाही.

ज्वारी, मका, बाजरी उत्पादक शेतकरी बांधवांनी हमीभावाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार व जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news