शेतकर्याँवर झालेला अन्याय दूर करा अन्यथा शासन/प्रशासनला परिणाम भोगावे लागतील – प्रसेनजीत पाटिल जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी.

शेतकर्याँवर झालेला अन्याय दूर करा अन्यथा शासन/प्रशासनला परिणाम भोगावे लागतील – प्रसेनजीत पाटिल जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी.

22 जुलै 2023 रोजी जळगाव जामोद, संग्रामपुर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामधे हजारो हैक्टर ज़मीन खरडून गेली, शेतीपिकाचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले, हजारो लोक बेघर झाली, गुरेढोरे मोठ्या प्रमानात मृत पावली. त्यावेळी आमदार, खासदार सर्व पक्षीय नेत्यानी गावागावात भेटी दिल्या. शेतकर्याना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळेल या आशेत शेतकरी वाट पाहुन होते. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने 22 जुलै 2023 रोजी झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या याद्या जाहिर केल्या यामधे नदी/नाल्या काठी असलेल्या जमिनीचे नुकसान झालेल्या खुप मोठ्या शेतकरी वर्गाला वगळल्या गेल्याचे याद्या पाहल्या नंतर शेतकर्याच्या लक्षात आले. सोबतच गावागावात ज्या लोकांची नावे आली त्यामधे निधी वाटपात प्रत्यक्ष नुकसानग्रस्तावर अन्याय होऊन वाटपात खुप मोठी तफावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुरग्रंस्तामधे असंतोष निर्माण झाला आहे. शेतकर्याँवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारन्यासाठी आज दिनांक 28/11/2023 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगाव जामोदच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत धडक देण्यात आली. यावेळी नुकसान भरपाई याद्यामधे झालेल्या घोळचा जाब राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांनी प्रशासनाला विचारला, हजारो अन्यायग्रस्त शेतकर्याँचे तक्रार अर्ज प्रशासनाला दिले जाणार आहेत त्यांच्या तक्रारीचे निवारण येत्या 8 दिवसात करुन न्याय देण्यात यावा अन्यथा पुढील आंदोलन लोकशाही मार्गाने होणार नाही त्यानंतर होनार्या परिणामाला शासन/प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा प्रसेनजीत पाटिल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दिला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, पराग अवचार, एम.डी. साबीर, शहराध्यक्ष ईरफान खान, महादेव भालतड़क, मोहसीन खान, वर्षाताई वाघ,संजय ढगे, विठ्ठल घुले, विठ्ठल वाघ,अनंता वाघ,संजय देशमुख,सुभाष कोकाटे, आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, सिद्धार्थ हेलोड़े, वामन गुडेकर, दादाराव धंदर, कैलास मानकर, गणेश वडनेरकर, वासुदेव वायझोड़े, मजीत मेंबर,शब्बीरभाई, सूपड़ा ताकोते, सुरेश पाचपोर, डिगांबर तिजारे, सुहास वाघ, विष्णु रोठे, विठ्ठल मानकर, ताहेर माही, राम वाघ, संतोष वेरुळकार, राम वाघ, मोईन राज, डिगांबर वायझोडे यांच्यासह शेकड़ो शेतकारी तथा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news