पातुर येथे वीर शहीद आनंदा काळपांडे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न

पातुर येथे वीर शहीद आनंदा काळपांडे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न

पातुर प्रतिनिधी पातुर येथील वीर पुत्र शहीद आनंदा काळपांडे हे 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली होती शहीद आनंदा काळपांडे यांनी पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसून आपल्या तोफखान्याने दुश्मनाचा खात्मा केला होता. यावेळी वीरगती प्राप्त झाली होती. त्यांचा आज स्मृति दिनानिमित्त गुरुवार पेठ येथील वीर आनंदा काळपांडे चौक येथे आज माजी सैनिक संघटना व एजूविला पब्लिक स्कूल यांच्यावतीने स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यादरम्यान पब्लिक स्कूलच्या वतीने शहरातून शहीद आनंदा काळपांडे यांच्या प्रतिमेची रॅली काढण्यात आली होती. या कार्यक्रमानिमित्त शहीद आनंदा काळपांडे यांना वीर पत्नी श्रीमती विमलाबाई आनंदा काळपांडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले, पातूरचे ठाणेदार किशोर शेळके व शेतकरी जागर मंचाचे प्रशांतजी गावंडे यांनी मानवंदना दिली. या कार्यक्रमाला तुकाराम देविदास निमखंडे महादेवजी प्रमाणे दिलीप बायस काशीरामखंडे अंबादास टप्पे अरुण राऊत शामराव भोसले सर्व माजी सैनिक उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान गुलाब काळपांडे प्रकाश निमकंडे गोपाल पाटील संतोष काळपांडे दयाराम काळपांडे सुखनंदन बोचरे वामन गोतरकार रामराव माऊली कर घनश्याम काळपांडे गजाननराव गाडगे प्रवीण इंगळे दिनेश काळपांडे प्रशांत बंड राजेश काळपांडे विलास राऊत संकेत काळपांडे जय काळपंडे अभिजीत उगले यांच्यासह पार्वताबाई काळपांडे नीता काळपांडे रत्ना काळपांडे कुसुम काळपांडे पंचफुला काळपांडे कमल काळपांडे यांच्यासह पब्लिक स्कूलचे विद्या गाडगे सुषमा इनामदार वाणी मॅडम वाडेकर मॅडम उपस्थित होत्या

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news