धुळ्याचा धर्मेश हिरे ‘छत्रपती करंडक’चा मानकरी

धुळ्याचा धर्मेश हिरे ‘छत्रपती करंडक’चा मानकरी

उत्स्फूर्त फेरीतून वक्त्यांची निवड ; ११० स्पर्धकांचा सहभाग

शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात पार पडली स्पर्धा

अकोला, ता.८ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमच सुरु झालेली व अवघ्या तीन वर्षात मानाची ठरलेली वक्तृत्व स्पर्धा अर्थात ‘छत्रपती करंडक’. यंदाच्या छत्रपती करंडकचा मानकरी धुळे येथील धर्मेश हिरे हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठरला आहे. श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृह गुरुवारी (ता.७) ही स्पर्धा पार पडली. राज्यभरातील ११० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्स्फूर्त फेरीतून धर्मेश हिरे या विद्यार्थ्याची करंडकसाठी निवड झाली.
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त छत्रपती करंडक आयोजन समिती व श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी शेतकऱ्यांना समर्पित छत्रपती करंडक ही राज्यस्तरीय खुली-आंतर महाविद्यालयीन स्पर्धा २०२१ पासून आयोजित करण्यात येत असून, यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सकाळी ११:३० वा. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. आशिष राऊत उपस्थित होते. तर पारधी पाड्यावर गरजवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे काम हाती घेतलेल्या मंगेश पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉ. शफीक अहमद, ज्योतीताई देशमुख, मधु जाधव, श्रद्धा थोरात यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन साक्षी पवार, प्रस्तावना अक्षय राऊत व आभार गौरी सरोदे यांनी मानले. राज्यभरातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. दिवसभर पार पडलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत रात्री ९ वाजता करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला अध्यक्ष म्हणून डॉ.आशीष राऊत यांची उपस्थिती होती. तर, प्राचार्य रामेश्र्वर भिसे, मोईन अली, प्रशांत गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, प्रशांत नागे, अक्षय ईळके यांची प्रमुख उपस्थिती होती. लहान गटाच्या वक्तृत्व स्पर्धेचे नीलेश पाकदूने, प्रदिप अवचार, प्रतिक महल्ले यांनी परीक्षण केले. मोठ्या गटाच्या स्पर्धेचे प्रा.मेघराज गाडगे, प्रा.स्वप्निल इंगोले, जिवन गावंडे यांनी परीक्षण केले. सूत्रसंचालन मयूर वानखेडे व
बक्षीस वितरण व आभार अक्षय राऊत यांनी मानले.
———————–
शेतकऱ्यांना समर्पित छत्रपती करंडक
‘छत्रपती करंडक’ ही वक्तृत्व स्पर्धा शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आली आहे. १२ किलो वजनाचा तांब्याचा फिरता करंडक स्पर्धेचे विशेष आकर्षण असते. तसेच विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह म्हणून लाकडापासून तयार केलेला ‘नांगर’ देण्यात येतो. समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी छत्रपती करंडक आयोजन समितीने या विचार पिठाची सुरुवात केली आहे.
—————————————-
राज्यभरातील स्पर्धकांचा सहभाग
छत्रपती करंडक या वक्तृत्वातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेला राज्यभरातील स्पर्धकांनी हजेरी लावली. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा परभणी येथील स्पर्धक सहभागी झाले होते. सोबतच मूळची राजस्थानची असलेली व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी स्पर्धेत सहभागी झाली होती.
———————————-
छत्रपती करंडक वक्तृत्वाची पंढरी!
‘छत्रपती करंडक’ ही स्पर्धा वक्तृत्वाची पंढरी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. आयोजन समितीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. छत्रपती करंडक रौप्य महोत्सवी ठरणार असल्याच्या शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या.
———————————-
वक्तृत्व स्पर्धेचे विजेते
नाव पारितोषिक
धर्मेश साहेबराव हिरे (धुळे) – छत्रपती करंडक ११,१११ रोख, मानाचा खलीता, मानाचा फेटा, पुस्तक

प्रवीण सुभाष काजळे (पुणे) – प्रथम क्रमांक – ७००१ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक

शुभम नंदकुमार मोटे (पुणे) – द्वितीय क्रमांक – ५००१ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक

मिथुन दत्तात्रय माने (सातारा) – तृतीय क्रमांक – ३००१ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक

श्रुती अशोक बोरस्ते (नाशिक) – चतुर्थ क्रमांक – २००१ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक

संकेत कृष्णा पाटील (कोल्हापूर) पंचम क्रमांक – १००१ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक

तेजस्विनी संजय पांचाळ (कोल्हापूर) उत्तेजनार्थ – ७०१ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक

वैष्णवी संतोष हागोणे (अमरावती) उत्तेजनार्थ – ७०१ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक

यश रवींद्र पाटील (मुंबई) उत्तेजनार्थ – ७०१ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक
———————————-
लहान गटातील विजेते
यशश्री चंद्रकिशोर गावंडे (अकोला) प्रथम क्रमांक – १,१११ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक

तन्मय खुशाल चौधरी (वाशिम) द्वितीय क्रमांक – ७७७ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक

देहुती प्रमोद बगले (अकोला) तृतीय क्रमांक – ५५५ रोख, सन्मानचिन्ह, पुस्तक

विशेष पारितोषिके – श्लोक अनिल लव्हाळे (अकोला), सिद्धांत सचिन टोंगळे (अकोला), गोकुळ अजय एखंडे, रोशन पशु चव्हाण (बार्शीटाकळी).
—————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news