महिलेची निर्गुन हत्या,पातुर तालुक्यातील दिग्रस येथील घटना
पातुर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रस बु येथील एका 50 वर्षीय महिलेची निर्गुण हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी दरम्यान घडली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रस बु येथील सुनंदा गवई वय 50 या महिलेची धारदार शस्त्राने निर्गुन हत्या झाल्याची घटना घडली, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी गोकुळराज,चान्नी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन,सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला, दरम्यान सदर हत्या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, नेमके सदर महिलेचा शस्त्राने निर्गुन खुण का केला हे मात्र वृत्त लिहिस्तोर समोर आले नाही, पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण, हेडकॉन्स्टेबल शिंदे, पोलिस कर्मचारी सुधाकर करवते हे करीत आहेत,
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा